ETV Bharat / city

Goa Election Result : गोव्यातील भाजपची स्थिती; निकालाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर चर्चा - सोशल मीडियावर गोवा निकालाची चर्चा

गोवा निवडणुकीनंतर (Goa Election) अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. १४ फेब्रुवारीला गोव्यातले मतदान पार पडले, तेव्हापासून सोशल मीडियावर आणि इतरत्र या निवडणुकीतील मतदारांच्या कौलाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा राज्यात भाजप (Goa BJP) हे तोडून मोडून सरकार स्थापन करणार असल्याचेही बोलले जात आहे.

goa election
गोवा भाजप
author img

By

Published : Mar 3, 2022, 5:21 PM IST

Updated : Mar 15, 2022, 4:19 PM IST

पणजी - बुधवारी रात्री गोव्यातला कार्निव्हल (Goa Carnival) संपला आहे. आता १० मार्चला होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे (Goa Election Result) लक्ष लागून राहिले आहे. गोवा निवडणुकीनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. १४ फेब्रुवारीला गोव्यातले मतदान पार पडले, तेव्हापासून सोशल मीडियावर आणि इतरत्र या निवडणुकीतील मतदारांच्या कौलाबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा राज्यात भाजप हे तोडून मोडून सरकार स्थापन करणार असल्याचेही बोलले जात आहे.

मागची १० वर्ष भाजपची सत्ता -

सध्या गोव्यात २०१२ पासून भाजप सलगतेने सत्तेवर आहे. या दहा वर्षांच्या काळात भाजपच्या मनोहर पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर आणि प्रमोद सावंत या तिघांनी मुख्यमंत्रीपद सांभाळले. त्याआधीही म्हणजे २००० सालापासून मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री म्हणून कार्य केले होते. पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत झालेली गोव्यातील भाजपने लढवलेली ही पहिलीच निवडणूक आहे. मागच्या वेळेस मनोहर पर्रीकर दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून गेले होते, तेव्हा भाजपने विधानसभेतील एकूण ४० जागांपैकी फक्त तेरा जागा जिंकल्या होत्या, अन काँग्रेसने सतरा जागा जिंकल्या.

२०१७ ला भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा पराभव

भाजपचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचाही 2017 च्या निवडणुकीत पराभव झाला होता. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा किंवा विद्यमान मुख्यमंत्र्यांचा निवडणुकीत पराभव होणे ही त्या पक्षाच्या दृष्टीने मोठी नामुष्कीची बाब असते. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा १९७७ साली रायबरेलीत असाच पराभव झाला होता, अर्थात अशाही परिस्थितीत चाळीसपैकी तेरा जागा जिंकूनसुद्धा भाजपने २०१७ला स्वतःकडे आमदार आणि सत्ता खेचण्यात यश मिळवले होतेच.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

मुख्यमंत्री प्रमोद सावंत सांखळी मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात गोव्यातले सर्वाधिक टक्के मतदान झाले आहे. हे सर्वाधिक मतदानाचे प्रमाण कुणाला फायदेशीर असू शकेल असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपने २०१७ ला तेरा जागा जिंकल्या होत्या, आता यापेक्षा अधिक किंवा बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २१ जागा हा पक्ष जिंकेल का? भाजप, काँग्रेस, आप आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यापैकी कोणताही पक्ष गोव्यात स्वबळावर सत्ता स्थापू शकण्याइतक्या म्हणजे चाळीसपैकी एकवीस जागा जिंकू शकेल अशी चिन्हे नाहीत.

निवडणुकीला सामोरे जाताना भाजपकडे २६ जागा होत्या, त्यापैकी अनेक आमदारांनी निवडणुकीत दुसऱ्या पक्षांची वाट धरली आहे. भाजपमध्ये प्रबळ असणाऱ्या काहींनी बंडखोरी करुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे.

बंडखोरांनी भाजपची डोकेदुखी वाढवली

या तगड्या भाजप बंडखोर उमेदवारांमध्ये मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर (पणजी मतदारसंघ) आणि माजी मुख्यमंत्री पार्सेकर हे आहेत. अर्थात भाजपसाठी ही फार मोठी डोकेदुखी नसणार. याचे कारण म्हणजे अपक्ष म्हणून निवडून आल्यास उत्पल पर्रीकर आणि माजी मुख्यमंत्री पार्सेकर हे सत्ता स्थापनेसाठी भाजपला की काँग्रेसला साथ देतील याचे उत्तर शोधणे आताही तसे फार अवघड नाही.

गोव्यातल्या एका जाणकाराच्या अंदाजानुसार यंदा सात अपक्ष निवडून येऊ शकतील, म्हणजे यापैकी एखादा मुख्यमंत्रीपदावरही दावा करु शकतो.

गोव्यात जातीधर्माचे राजकारण सोशल मीडियावर चर्चेत

गोव्यात कुठल्या मतदारसंघात कुठल्या जातीचे - सारस्वत, भंडारी, ओबीसी - प्राबल्य आहे, कुठल्या मतदारसंघात कॅथोलिक मतदार निवडीच्या तराजूचा काटा फिरवू शकतात, वगैरे निकषांवर कोण खात्रीने निवडून येऊ शकतो यावर सोशल मिडियात दररोज चर्चा घडताहेत. उदाहरणार्थ, शहरी पणजी मतदारसंघात सारस्वत आणि कॅथोलिक मतदारांचे मत निर्णायक ठरते. पणजी येथे भाजप बंडखोर उत्पल मनोहर पर्रीकर आणि भाजपचे बाबुश मोन्सेरात यांच्यांत फाईट आहे.

मडगावात सारस्वत उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक असते. खूप वर्षांपूर्वी येथून बाबू नायक निवडून येत असत, त्यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार उदय भेम्बरे जायंट किलर ठरले होते. गेली अनेक वर्षे मडगाव हा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा बालेकिल्ला आहे. मतमोजणीच्या आधीचे एकूण हे चित्र अगदी मजेशीर, उत्कंठावर्धक आहे हे निश्चित.

Last Updated : Mar 15, 2022, 4:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.