ETV Bharat / city

Har Ghar Tiranga : हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत भारतीय तटरक्षक दलाकडून सायकल रॅलीचे आयोजन - Amrit Mohotsav

स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ (Amrit Mohotsav) आणि ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियाना अंतर्गत भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय, 11 युनिटने आज सायकल रॅली (Organized cycle rally by Indian Coast Guard) काढली. डिआयजी अरुणाभ बोस यांनी रॅलीला झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. मुख्यालयापासून वारका समुद्र किनाऱ्यापर्यंत निघालेल्या रॅलीत, अधिकारी आणि संरक्षण दलातील कर्मचारी असे एकुण 75 जण सहभागी झाले होते.

Har Ghar Tiranga
हर घर तिरंगा
author img

By

Published : Aug 6, 2022, 8:04 PM IST

पणजी : स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ (Amrit Mohotsav) आणि ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियाना अंतर्गत भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय, 11 युनिटने आज सायकल रॅली (Organized cycle rally by Indian Coast Guard) काढली. डिआयजी अरुणाभ बोस यांनी रॅलीला झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. मुख्यालयापासून वारका समुद्र किनाऱ्यापर्यंत निघालेल्या रॅलीत अधिकारी आणि संरक्षण दलातील कर्मचारी असे एकुण 75 जण सहभागी झाले होते.

सायकल रॅलीच्या मार्गावर सायकलपटूंनी स्थानिकांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेविषयी सांगत, 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरावर तिरंगा फडकावण्याविषयी माहिती दिली. तसेच स्थानिक मच्छीमार समुदायाला समुद्रात मासेमारीदरम्यान घ्यावयाची सुरक्षितता, सागरी परिसर स्वच्छतेचे आणि वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले आणि प्लास्टीकचा वापर टाळण्याचे आवाहन केले.

स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत गोवा तटरक्षक दलाकडून चिखली येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी आणि गोवा क्रांतीचे जनक टी. बी. कुन्हा यांच्या वास्को येथील पुतळ्याच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकावला जाणार आहे. तसेच तटरक्षक दल मुख्यालय परिसरात वृक्षारोपण आणि कार्यालयीन तसेच निवासी इमारतीला तिरंगी रंगाची आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा : AZADI KA AMRIT MAHOTSAV : जागतिक वारसास्थळांवर राष्ट्रीय रंगांची उधळन; 'आझादी का अमृत महोत्सव' पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.