पणजी - मिलिंद नाईक (Goa social welfare minister Milind Naik) यांनी गोवा सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा ( Goa Bjp Minister Milind Naik Resigns ) दिला आहे. सेक्स कॅण्डलमध्ये गुंतल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केल्यानंतर तसेच संकल्प आमोणकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर नगर विकास मंत्री मिलिंद नाईक यांनी आपल्या मंत्रिपदाचा आज रात्री उशिरा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहीती, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
या प्रकरणाची मुक्त आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी, स्वीकारण्यात आली आहे. हा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मिलिंद नाईक हे गोव्यातील प्रमोद सावंत सरकारमध्ये नगरविकास आणि समाजकल्याण या खात्यांचे मंत्री होते.
मिलिंद नाईक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर भाजपानेही राज्यात सावध भूमिका घेतली. काँग्रेसने थेट पत्रकार परिषदेत पुरावे उघड केल्याने भाजपाला मोठा धक्का बसलाय. त्यातच नरेंद्र मोदी गोवा स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमाला 19 डिसेंबरला गोव्यात येत आहे. म्हणून भाजपाने सावध भूमिका घेऊन यात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले
काय प्रकरण?
बिहारमधील एका महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा गंभीर आरोपाचे ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावेही असल्याचा दावा चोडणेकर यांनी केला. चोडणेकर यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यापालांची भेट घेऊन संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्याचवेळी ऑडिओ व व्हिडिओ पुराव्यांसह काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी पणजी पोलीस ठाण्यात तक्रारही केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत मिलिंद नाईक यांना पदावरून हटवण्यात आले आहे.
हेही वाचा - Coronavirus Omicron : राज्यात आज ओमायक्रॉनचे ४ नवे रुग्ण; रुग्णांचा आकडा ३२ वर, २५ रुग्णांना डिस्चार्ज