ETV Bharat / city

Goa Election 2022 : उत्पल पर्रीकर, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, बाबूश मोन्सेरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल - बाबुश मोन्सरात

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे ( Manohar Parrikars son Utpal Parrikar ) सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी आज पणजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी ( Utpal Parrikar file nomination papers from Panaji ) अर्ज दाखल केला आहे. तसेच आज आज मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि पणजी भाजपाचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गोवा
Goa Election 2022
author img

By

Published : Jan 27, 2022, 1:31 PM IST

Updated : Jan 27, 2022, 2:41 PM IST

पणजी - भाजपाच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) लढवण्याची घोषणा करणारे उत्पल पर्रीकर यांनी आज पणजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी ( Utpal Parrikar file nomination papers from Panaji ) अर्ज दाखल केला आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पणजी भाजपाचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अर्ज दाखल करण्यापूर्वी आज उत्पल आणि बाबुश मोन्सेरात यांनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उत्पल यांच्या या भूमिकेमुळे भाजपाची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. उत्पल हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे ( Manohar Parrikars son Utpal Parrikar ) सुपुत्र आहेत.

उत्पल पर्रीकर यांची प्रतिक्रिया

लोकांच्या विश्वासावर निवडणूक रिंगणात उतरलो असून लोक पुन्हा आपल्याला विजयी करणार असल्याचे भाजपा उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनी म्हटलं. तर पणजीकर आणि देवी महालक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आपण निवडणूक लढवत असल्याचे उत्पल यांनी म्हटलं.

बाबुश मोन्सेरात यांची प्रतिक्रिया

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज दाखल

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सॅक्युलिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, की या मतदारसंघातून भाजप मोठ्या संख्येने निवडून येईल. याचा मला आणि कार्यकर्त्यांना विश्वास आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुसंख्य जागा मिळणार आहेत. भाजपला २२ जागा मिळणार असून आमचे पुन्हा सरकार येणार आहे.

  • Once again I've filed nomination from Sanquelim constituency. BJP will win the constituency with a big margin & I will be elected from here again. The workers and I are confident. We are coming back to power in Goa in 2022 with 22 plus seats: Goa CM Pramod Sawant#GoaElections pic.twitter.com/lIC4dZBnKS

    — ANI (@ANI) January 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मनोहर पर्रिकरांचा उत्पल सांभाळणार वारसा -

अनेक वर्षांपासून मनोहर पर्रीकर हे राजधानी पणजी मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते. आमदार, विरोधी पक्षनेते ते राज्यात भाजपाचे पाहिले मुख्यमंत्री असा त्यांचा याच मतदारसंघातून प्रवास झाला. याच मतदारसंघात त्यांना मानणारा आणि अर्थातच त्यांना मनोहर भाई ही उपाधीही देणारा मतदारवर्ग आहे. मनोहर पर्रिकरांमुळेच वर्षानुवर्षे हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत पर्रीकर यांच्या नावाचा उपयोग न करता निवडणूक लढविण्याचे आदेश पक्षाने उत्पल पर्रीकर यांना दिले आहेत.

उत्पल पर्रीकर निवडणूक मैदानात उतरल्यासंदर्भात मनोहर पर्रीकर यांचे बंधू अवधूत पर्रीकर यांची प्रतिक्रिया

उत्पल यांच्या बंडखोरीचे काय आहे कारण?

पणजी विधानसभा मतदार संघातून उत्पल पर्रिकरचा पत्ता कट करून भाजपाने बाबुश मोन्सेरातला तिकीट दिलं आहे. केंद्रीय नेतृत्वाचा हा निर्णय अमान्य करत उत्पलने पार्टीविरोधात दंड थोपटले आहेत. भाजपाने पणजीतून उमेदवारी नाकारल्यानंतर याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय उत्पल पर्रिकर यांनी जाहीर केला आहे. उत्पल पर्रिकर पणजीतूनच विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम होते. भाजपकडून उत्पल यांना अन्य दोन पर्याय देण्यात आले होते. मात्र, ते त्यांना मंजूर नव्हते. अखेर भाजपने पणजीतून तिकीट नाकारल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन उत्पल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय जाहीर केला. उत्पल यांची बंडखोरी भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.

बाबुश मोन्सेरात आहेत तरी कोण?

पणजीतील भाजपाचे उमेदवार बाबुश मोन्सरात यांचे राजकीय आयुष्य नेहमीच विविध आरोपांनी गाजलेले आहे. तरुणीवर बलात्कार केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यासमोर मोन्सरात यांची राजकीय कारकीर्द कधीच उभारी घेऊ शकली नाही. पहिल्यांदाच पर्रीकर केंद्रात संरक्षण मंत्री झाल्यावर 2017 साली त्यांचे निकटवर्तीय सिद्धार्थ कुंकलीकर या मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयीही झाले होते. पर्रीकर हे केंद्रातून राज्यात परतले. तेव्हा पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यानंतर पोटनिवडणुकीत पुन्हा एकदा भाजपैने आपला गड राखला होती. त्यावेळी त्यांच्यासमोर मोन्सरात हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते.

25 वर्षाहून अधिक काळ भाजपा आणि पर्यायाने पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, मार्च 2019 ला पर्रिकरांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पुन्हा एकदा पोटनिवडणुक झाली. प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत तत्कालिन काँग्रेस उमेदवार बाबुश मोन्सरात यांनी भाजपा उमेदवार सिद्धार्थ कुंकलीकर यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला होता. अखेर पहिल्यांदाच 25 वर्षे अबाधित असलेला भाजपचा गड काँग्रेसने जिंकला होता. आता तेच बाबुश मोन्सरात भाजपात असून मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्रा उत्पल यांच्याविरोधात मैदानात आहेत. या दोघांमध्ये कोण बाजी मारते याबाबत प्रचंड उत्सुकता असून निकाल काय येतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Last Updated : Jan 27, 2022, 2:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.