पणजी - मनिष सिसोदिया यांच्या 'शिक्षा' या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन पणजी येथे करण्यात आले. यावेळी बोलताना, दिल्लीची पुढील निवडणूक ही शिक्षणाच्या नावाने लढणार असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले आहे.
शिक्षणक्षेत्रातील दूखणे संपवले नाही तर प्रत्येक पिढीला भारत विकसनशील म्हणूनच शिकवावे लागेल - सिसोदिया
आम्हाला शिक्षणाप्रती, नव्हे तर देशाप्रती प्रेम आहे. देश चांगला बनविण्यासाठी शिक्षण हे एक माध्यम आहे. शिक्षणक्षेत्रावर काम करत त्यामधील दूखणे संपवले नाही तर पुढेही प्रत्येक पिढीला भारत एक विकसनशील देश म्हणूनच शिकवावे लागेल. आजपर्यंत धर्म, जाती, प्रदेशाच्या नावाने अनेक निवडणुका लढविल्या गेल्या. परंतु, आम्ही दिल्लीची पुढची निवडणूक ही शिक्षणाच्या नावानेच लढणार, असे प्रतिपादन दिल्लीचे शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांनी पणजीत केले.
हेही वाचा... शेतकऱ्यांचा स्वाभिमानी 'वाघ' आता विधानसभेच्या रणांगणात?
सिसोदिया यांच्या ' शिक्षा' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन गुरुवारी पणजीतील एका हॉटेलमध्ये विशेष कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी आम आदमी पक्षाचे गोवा संयोजक एल्वीस गोम्स, पणजीतील निर्मला इन्स्टिट्यूटच्या माजी प्राचार्य सिस्टर डॉ. रिटा पेस्ट आणि डॉ. मनस्वी कामत व्यासपीठावर उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्राचा गंध नसलेल्या व्यक्ती शैक्षणिक धोरण ठरवतात - सिसोदिया
सिसोदिया कार्यक्रम स्थळी उशिरा पोहोचल्याने कार्यक्रमाला सुरुवात उशिराने सुरुवात झाली. तोच धागा पकडून पुढे बोलताना सिसोदिया म्हणाले, देशात अनेक गोष्टींना उशीर झाला आहे. विद्यमान दिल्ली सरकारने सरकारी शाळांमधील शिक्षक का अपयशी ठरत आहे. याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता या शिक्षकांना शैक्षणिक कामापेक्षा इतर सरकारी कामांना अधिक जुंपलेले असते. हेच सरकारी शाळांमधील शिक्षकांचे दूखणे आहे., असे म्हटले आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्राचा गंध नसलेल्या व्यक्ती शैक्षणिक धोरण ठरवत असल्याने ते अधिक बोजड होत आहे. त्यामुळे शिक्षक कारकून बनत आहे. या पुस्तकातून शिक्षकांचे दुखणे शोधण्याचा प्रयत्न केला असल्याचे सिसोदियांनी सांगितले.
हेही वाचा... कर्जत-जामखेड, पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता...
देशातील सरकारी शाळा बंद होत असताना दिल्लीतील सरकारी शाळा कशा सुरू आहेत, याचा विचार केला पाहिजे, असे सांगून सिसोदिया यांनी 20 वर्षांच्या शिक्षणानंतर व्यक्ती ' आनंदी' कसे रहावे हे शिकत नसेल तर दुसऱ्यांना कसा आनंद देईल. यासाठीच दिल्ली सरकार पुढील वर्षांपासून ' देशभक्ती' हे शिकविण्याबरोबर देशप्रेम म्हणजे नेमकं काय ? हे कसे समजून घ्यावे याचा अभ्यासक्रमात समावेश करणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.