ETV Bharat / city

माझ्याकडे फक्त प्रस्ताव पाठवण्याचे काम करा, मंजुरी देणे माझे काम - नितीन गडकरी - important cities will connect by Metro in Goa

तुम्ही फक्त मागणी करा, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मी पुरवितो, माझ्याकडे फक्त प्रस्ताव पाठवण्याचे काम करा, मंजुरी देणे माझे काम असल्याचे उद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. गडकरी सोमवारपासून (दि.1 नोव्हेंबर) दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज गडकरी यांनी आपल्या भाषणांतून दिवंगत केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

नितीन गडकरी
नितीन गडकरी
author img

By

Published : Nov 1, 2021, 9:19 PM IST

पणजी - तुम्ही फक्त मागणी करा, तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मी पुरवितो, माझ्याकडे फक्त प्रस्ताव पाठवण्याचे काम करा, मंजुरी देणे माझे काम असल्याचे उद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. गडकरी सोमवारपासून (दि.1 नोव्हेंबर) दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज गडकरी यांनी आपल्या भाषणांतून दिवंगत केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.

बोलताना नितीन गडकरी

पणजी सरकारला पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी हवा तो प्लॅन करा आणि मंजुरीसाठी माझ्याकडे या, असे सांगत गोव्यातील महत्त्वाची शहरे मेट्रोने जोडण्याचा मनोदय गडकरी यांनी व्यक्त केला. लोटलीम-वेरणा या चार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यात गडकरी बोलत होते.

मुंबई-गोवा महामार्ग कर्नाटकपर्यंत नेणार

आपल्या भाषणात गडकरी यांनी मनोहर पर्रिकरांच्या आठवणींना उजाळा दिला. गोव्यातील विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत 2017 मध्ये सरकार बनविण्यासाठी आपण महत्वाची भूमिका बाजवल्याचेही गडकरी यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्ग 2022 पर्यंत पूर्ण होऊन तो कर्नाटकपर्यंत नेणार असल्याचे ही ते म्हणाले.

झुआरी नदीवर पॅरिसप्रमाणे आयफेल टॉवरप्रमाणे व्हिवर गॅलरी उभारणार

झुआरीवर आयफेलप्रमाणे मनोरा उभारणार पॅरिसमध्ये असणारा आयफेल टॉवर पाहण्यासाठी लोक जातात. मात्र, यापुढे झुआरी नदीवर पॅरिस प्रमाणे आयफेल टॉवर उभारण्यात येणार आहे. झुआरी पुलावरील व्हिवर गॅलरीच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. झुआरी नदीवर उभारण्यात येणाऱ्या व्हिवर गॅलरीमुळे हे पर्यटनाचे आकर्षण केंद्र होणार असल्याची माहितीही गडकरी यांनी आपल्या भाषणातून दिली.

टेलिमेडिसिन सुविधेचा गडकरींनी केला शुभारंभ

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या टेलिमेडिसिन सुविधेचा गडकरी यांनी शुभारंभ केला. यामुळे राज्यातील सर्व रुग्णालयात एका क्लिकवर औषधे उपलब्ध होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

हे ही वाचा - नोटबंदी, जीएसटीने नागरिक हैराण - राहुल गांधींची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.