पणजी - गोव्याच्या सास्कृतिक क्षेत्रात मानाची आणि महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या कला अकादमी इमारतीबाबतचा वाद सध्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत आहे. इमारतीची स्थिती विचारात घेऊन छप्पर दुरुस्तीसाठी परवानगी मागितली आहे. या बाबतचा महत्वाचा निर्णय सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात सरकारकडून घेतला जाणार आहेत. 8 फेब्रुवारीपासून होणाऱ्या गोवा जागोर महोत्सवा विषयी माहिती दोण्यासाठी पणजीतील कला अकादमीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर गोव्याचे कला आणि संस्कृत मंत्री गोविंद गावडे यांनी ही माहिती दिली.
गावडे म्हणाले, कला अकादमीच्या इमारतीबाबतचा विषय सध्या उच्च न्यायालयात आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत प्रतिज्ञापत्र सादर करून छप्पर दुरुस्तीची मागणी केली आहे. त्याला परवानगी मिळाल्याने गोवा साधन सुविधा महामंडळाला आराखडा आणि खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले आहे.
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने काही भागाची डागडुजी करण्यात आली आहे. तसेच 10 मार्चपर्यंत दिनानाथ मंगेशकर सभागृह खुले असणार आहे. ते 31 मे पर्यंत सुरू ठेवण्याचा सरकारचा विचार आहे. 10 वर्षांपूर्वी चार्ल्स कुरिया फाऊंडेशने हे केले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. या पत्रकार परिषदेसाठी कुडका सरपंच वेरोदिना डिसोझा, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, जागोर महोत्सव आयोजक नागेश महारुद्र पंचायतन संस्थान कुडकाचे अध्यक्ष एकनाथ नार्वेकर आदी उपस्थित होते.