ETV Bharat / city

भाजप सरकारविरोधात गोवा सुरक्षा मंचाकडून मोर्चाचे आयोजन - आंदोलन

कॅसिनोमुळे गोव्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन होत आहे. त्यामुळे भाजप सरकारने कॅसिनो व्यवहारावर त्वरित श्वेतपत्रिका जारी करावी. कॅसिनोविरोधात आंदोलनाची सुरवात म्हणून बुधवार 10 जुलैला शहरात मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती मंचाचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजप सरकार विरोधात गोवा सुरक्षा मंचाकडून मोर्चाचे आयोजन
author img

By

Published : Jul 9, 2019, 10:48 PM IST

गोवा - पणजीत गोवा सुरक्षा मंचाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सत्ताधारी भाजपने व्यक्तीगत स्वार्थासाठी गोवा कॅसिनो माफियांना विकून टाकला आहे. कॅसिनो स्थलांतराच्या प्रश्नावर भाजपने मागील 7 वर्षे गोवा वासियांची दिशाभूल केली आहे, अशी टीका सुभाष वेलिंगकर यांनी यावेळी केली.

भाजप सरकार विरोधात गोवा सुरक्षा मंचाकडून मोर्चाचे आयोजन

सरकारने गेमिंग कमिशनरची नियुक्ती करावी, कॅसिनोच्या आतापर्यंतच्या व्यवहारावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, कॅसिनो मांडवीतून नेमके कधी हटविले जाणार याची कालमर्यादा जाहीर करावी, तसेच ते कुठे स्थलांतरित करणार तेही जाहीर करावे. अशा मागण्या यावेळी मंचाकडून करण्यात आल्या. भाजप सरकार गोव्याचे सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकृतीकरणास कारणीभूत आहे. याचा निषेध करण्यासाठी 10 जुलैला दुपारी 3 वाजता पणजीतील इमेक्यूलेट चर्च चौक ते आझाद मैदान असा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे, असे वेलिंगकर यावेळी म्हणाले.

Intro:पणजी : कँसिनोमुळे क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने छोटे असलेल्या गोव्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन होत आहे. त्यामुळे भाजप सरकारचा निषेध करत कँसिनों व्यवहारावर त्वरित श्वेतपत्रिका जारी करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी गोवा सुरक्षा मंच बुधवारी (दि. 10) दुपारी पणजीत निषेध मोर्चा काढणार आहे.

Body:पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोसुमं नेते सुभाष वेलिंगकर म्हणाले, सत्ताधारी भाजपने व्यक्तीगत स्वार्थासाठी गोवा कँसिनो माफियांओ विकून टाकला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या प्रश्नावर भाजपने मागील 7 वर्षे गोमंतकियांची दिशाभूल चालवली आहे. 2012 पासून भाजपने कँसिनो हटविणार असे आश्वासन देत निवडणूक जिंकत आला असून त्यानंतर मात्र त्या प्रश्नापाइ फारकत घेतली आहे. भाजप सरकार गोव्याचे सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विक्रुतीकरणास कारणीभूत आहे. याचा निषेध करण्यासाठी 10 रोजी दुपारी 3 वाजता पणजीतील इमेक्यूलेट चर्च चौक ते आझाद मैदान असा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये अनेक बिगर सरकारी संस्थाही सहभागी होणार आहेत.
पुढे बोलताना वेलिंगकर म्हणाले, सरकारने गेमिंग कमिशन नियुक्ती करावी, कँसिनोंच्या आतापर्यंतच्या व्यवहारावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, कँसिनो मांडवीतून नेमके कधी हटविले क्षजाणार याची कालमर्यादा जाहीर करावी. तसेच त्यानंतर ते कुठे स्थलांतरित करणार तेही जाहीर करावे, या निषेध मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2015 मध्ये कँसिनो हटविण्याची घोषणा केली होती. तर नुकत्याच पार पडलेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकित सर्वच विरोधकांनी कँसिनो हटविण्याची भुमिका घेतल्यानंतर गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही कँसिनो हटावची घोषणा केली होती, अषे सांगून वेलिंगकर म्हणाले, विद्यमान मुख्यमंत्री भाजटने कँसिनो बंद करणार असे कधीच म्हटले नव्हते. तसेच ते पर्यटनाचा भाग आहेत असे म्हणातात. त्यामुळे गोव्याची ओळख जुगार, देहविक्रय व्यवसाय आणि अमलीपदार्थ यांचा अड्डा बनण्याची भीती आहे.
यावेळी गोसुमं अध्यक्ष आत्माराम गांवकर, गोविंद देव, विनायक चारी, संदीप निगळ्ये आदी पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.