ETV Bharat / city

केंद्रीय खाणमंत्र्यांच्या उत्तराने गोवा मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ठरणार खोटे - सुभाष वेलिंगकर - गोवा सुरक्षा मंच सुभाष वेलींगकर

खाणबंदीवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय पातळीवर विशेष मंत्रीगटाची स्थापना करण्यात आल्याच्या घोषणेमुळे गोव्याचा खाण व्यवसाय सुरु झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे. असे गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलींगकर म्हणाले आहेत.

सुभाष वेलींगकर
author img

By

Published : Sep 10, 2019, 7:08 PM IST

पणजी - गोव्यातील खाण उद्योग केव्हा सुरु होईल याबाबत ठोस आश्वासन देण्याचे केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी टाळले. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी नोव्हेंबरमध्ये खाण उद्योग सुरु होईल, अशी यापूर्वी केलेली घोषणा खाण आपदग्रस्तांची दिशाभूल करणारी ठरली आहे. अशी टीका गोवा सुरक्षा मंचाचे सुभाष वेलिंगकर यांनी केली आहे.

हेही वाचा - गोव्याला लुटणाऱ्या 'या' खात्याचा ताबा मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे घ्यावा, काँग्रेसची मागणी

केंद्रीय मंत्री जोशी सोमवारी गोव्यात आले असता त्यांनी केंद्र सरकारच्या १०० दिवसांतील निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. तेव्हा गोव्यातील बंद खाण व्यवसाय कधी सुरू होईल, असा प्रश्न करण्यात आला असता. त्यांनी खाण व्यवसाय सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. याचा आधार घेत गोवा सुरक्षा मंच पक्षप्रमुख सुभाष वेलींगकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे गोवा भाजपा नेतृत्वावर टीका केली आहे.

हेही वाचा - गोव्यातील गणेशोत्सवासाठी सुरक्षेचा आढावा; पोलिसांच्या गणेश मंडळांना सुरक्षेच्या सूचना

वेलिंगकर यांनी म्हटले आहे की, खाणबंदीवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय पातळीवर विशेष मंत्रीगटाची स्थापना करण्यात आल्याच्या घोषणेमुळे गोव्याचा खाण व्यवसाय सुरु झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला आहे. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की, २०२० पर्यंत देशभर विविध ठिकाणी खाणबंदी लागू करण्यात आली आहे. गोव्याच्या खाणप्रश्नी सरकारची सरळसरळ टोलवाटोलवी आणि आजचे मरण उद्यावर ढकलण्याचे नाटक सुरू आहे.

हेही वाचा - गोव्याच्या वीज खात्यात सुमारे चार कोटींचा भ्रष्टाचार; रायझिंग गोवन्सचा आरोप

या सर्वांचा विचार करता सरकारने पाणी, वीजपुरवठा, रस्त्यांचे खड्डे बुजवून दुरुस्ती आणि खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत सरकारने निश्चित कालमर्यादा घोषित करावी, अशी मागणी वेलींगकर यांनी केली आहे.

Intro:पणजी : गोव्यातील खाण उद्योग केव्हा सुरु होईल या बाबत ठोस आश्वासन देण्याचे केंद्रीय खाणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी टाळले. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी नोव्हेंबरमध्ये खाण उद्योग सुरु होईल, अशी यापूर्वी केलेली घोषणा खाण आपदग्रस्तांची दिशाभूल करणारी ठरली आहे. अशी टीका गोवा सुरक्षा मंचने केली आहे.

Body:केंद्रीय मंत्री जोशी सोमवारी गोव्यात आले असता त्यांनी केंद्र सरकारच्या 100 दिवसांतील कठोर निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. तेव्हा गोव्यातील बंद खाण व्यवसाय कधी सुरू होईल, असा प्रश्न करण्यात आला असता. त्यांनी बंद खाण व्यवसाय सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. याचा आधार घेत गोवा सुरक्षा मंच पक्षप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करत सरकार व भाजपा नेतृत्वावर टीका केली आहे.
वेलिंगकर यांनी म्हटले आहे की, खाणबंदीवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय पातळीवर विशेष मंत्रीगटाची स्थापना करण्यात आल्याच्या घोषणेमुळे गोव्याचा खाण व्यवसाय सुरु झाल्य च आभार निर्माण करण्यात आला आहे. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की, 2020 पर्यंत देशभर विविध ठिकाणी खाणबंदी लागू करण्यात आली आहे. गोव्याच्या खाणप्रश्नी सरकारची सरळसरळ टोलवाटोलवी आणि आजचे मरण उद्यावर ढकलण्याचे नाटक सुरू आहे.
या सर्वांचा विचार करता सरकारने पाणी, वीजपुरवठा, रस्त्यांचे खड्डे बुजवून दुरुस्ती आणि खाण उद्योग पुन्हा सुरू करण्याबाबत सरकारने निश्चित कालमर्यादा घोषित करावी, अशी मागणी करत वेलिंगकर यांनी केली आहे.
...
subhash velingkar फोटो ईमेल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.