ETV Bharat / city

गोव्यातील सरकार टिकवण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला पोहचू शकते - गोवा सुरक्षा मंच - Central Government

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष नुकताच भाजपमध्ये विलिन झाला आहे. गोव्याचे उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांचाही पदभार काढून घेण्यात आला आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एकूण ३ आमदार होते. त्यातील २ भाजपमध्ये सामील झाले. ढवळीकर भाजपमध्ये सामील झाले नाहीत, त्यामुळे गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांची पदावरुन हकालपट्टी केली.

गोवा सुरक्षा मंच
author img

By

Published : Mar 28, 2019, 8:24 AM IST

पणजी - गोव्यात सत्तेसाठी सुरू असलेला घोडेबाजार पाहता येथे पोटनिवडणुकांचा वर्षाव होईल. त्याबरोबर स्वतःची पोळी भाजण्यासाठी सुरू असलेले पक्षांतर हा अनैतिकतेचा कळस आहे. त्याबरोबर गोव्यातील सरकार टिकवण्यासाठी केंद्र सरकारच्या आडून भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते, असा आरोप गोवा सुरक्षा मंचचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

भाजप, मगो, काँग्रेस आदी पक्षांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. केवळ आपल्या कौटुंबिक स्वार्थासाठी हे लोक राजकारण करत आहेत. अनैतिक पद्धतीने स्थापन करण्यात आलेल्या गोवा सरकारची पत गेलेली आहे. त्यामुळे दिवंगत मनोहर पर्रीकर यांची प्रतिमा वापरून सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांच्या अस्थीदर्शन आणि विसर्जनाचा पक्षीय पातळीवर कार्यक्रम आयोजित केला गेला. परंतु, तो ' फ्लॉफ शो' ठरला, असेही वेलिंगकर म्हणाले.

जेव्हा कला अकादमी येथे जनतेच्या अंत्यदर्शनासाठी पर्रीकर यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते तेव्हा लोकांना मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न पत गमावलेल्या भाजपने केला. मात्र, लोकांनीच याकडे पाठ फिरवली असल्याचे वेलिंगकर यांनी सांगितले.गोवा सुरक्षा मंचची पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारचे आमिष न दाखवता लोकांपर्यंत पोहचत आहोत. त्याला प्रतिसाद मिळत आहे. तसेच लोकसभेच्या दोन्ही जागांवर उमेदवार उभे केले जाणार आहेत. उमेदवारांची नावे ३१ मार्च रोजी जाहीर केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यातील राजकीय स्थिती पाहता हे सरकार कोसळणार आहे. त्यामुळे राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेशी युती ठेवणार का ? असेल विचारले असता शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे. येथील स्थानिक कार्यकारिणीऐवजी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि गोवा प्रभारी संजय राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वेलिंगकर यांनी नमूद केले.

Intro:पणजी : गोव्यात सत्तेसाठी सुरू असलेला घोडेबाजार पाहता येथे पोटनिवडणुकांचा वर्षाव होईल. त्याबरोबर स्वतः ची पोळी भाजण्यासाठी सुरू असलेले पक्षांतर हा अनैतिकतेचा कळस आहे. त्याबरोबर गोव्यातील सरकार टिकवण्यासाठी केंद्र सरकारच्या आडून भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते, असा आरोप गोवा सुरक्षा मंचचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

Body:वेलिंगकर म्हणाले, भाजप, मगो, काँग्रेस आदी पक्षांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. केवळ आपल्या कौटुंबिक स्वार्थासाठी हे लोक राजकारण करत आहेत. अनैतिक पद्धतीने स्थापन करण्यात आलेल्या गोवा सरकारची पत गेलेली आहे. त्यामुळे दिवंगत मनोहर पर्रीकर यांची प्रतिमा वापरून सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांच्या अस्थीदर्शन आणि विसर्जनाचा पक्षीय पातळीवर कार्यक्रम आयोजित केला गेला. परंतु, तो ' फ्लॉफ शो' ठरला. जेव्हा कला अकादमी येथे जनतेच्या अंत्यदर्शनासाठी पर्रीकर यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते तेव्हा लोकांना मोठ्यासंख्येने हजेरी लावली होती. याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न पत गमावलेल्या भाजपने केला. मात्र, लोकांनीच याकडे पाठ फिरवली.
याला कारण भाजपने जनतेच्या प्रश्नापासून घेतलेली फारकत आहे, असे सांगून वेलिंगकर म्हणाले, गोवा सुरक्षा मंचची पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारचे आमिष न दाखवता लोकांपर्यंत पोहचत आहोत. त्याला प्रतिसाद मिळत आहे. तसेच लोकसभेच्या दोन्ही जागांवर उमेदवार उभे केले जाणार आहेत. उमेदवारांची नावे ३१ मार्च रोजी जाहीर केली जातील.
गोव्यातील राजकीय स्थिती पाहता हे सरकार कोसणार आहे. त्यामुळे राज्यातील २५ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू आहे.
शिवसेनेशी युती ठेवणार का ? असेल विचारले असता वेलिंगकर म्हणाले , शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे. येथील स्थानिक कार्यकारिणी ऐवजी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि गोवा प्रभारी संजय राऊत यांच्याशी चर्चा करणार आहोत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.