ETV Bharat / city

आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकसित करण्याकडे गोव्याचे लक्ष - विश्वजीत राणे - Goa minister Vishwajit Rane and Apprenticeship seminar at goa

व्यवसायाची व्याख्या बदलत आहे, तसेच यंत्रांमध्येही बदल होत आहे. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार बदलते कौशल्य सर्वांच्या अंगी असले पाहिजे. यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याकडे गोवा सरकारचा कल असल्याचे प्रतिपादन विश्वजीत राणे यांनी केले.

गोव्यात उद्योग मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते अप्रेंटिसशिप पंधरवड्याचा शुभारंभ
author img

By

Published : Oct 12, 2019, 2:04 PM IST

पणजी - गोवा सरकारतर्फे शुक्रवारी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत अप्रेंटिसशिप पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. गोव्याचे कौशल्ये व विकास मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या सत्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सीआयआय गोवाचे अध्यक्ष ललित सारस्वत, संचालक दीपक देसाई, एमएसडीईच्या सहाय्यक सल्लागार सुनिता संघी, गौरव कपूर, कैलाश चंद आदी उपस्थित होते.

गोव्यात उद्योग मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते अप्रेंटिसशिप पंधरवड्याचा शुभारंभ

हेही वाचा... नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी पुन्हा फडणवीस सरकार सत्तेवर आणा - प्रमोद सावंत

गोव्यात अप्रेंटिसशिप पंधरावड्याचा शुभारंभ

कौशल्य विकासाला प्राधान्य देत खाते आणि उद्योग क्षेत्र यामधील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यास उद्योग क्षेत्राचेही सहकार्य आवश्यक आहे. गोवा सरकार यासाठी डिसेंबर महिन्यात परिषद घेणार आहे. ज्यामुळे किमान दोन ते अडीच टक्के लोकांना रोजगार मिळेल असे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे यावेळी बोलताना राणे म्हणाले.

हेही वाचा... भाजप सत्तेत येण्यास राष्ट्रवादीचा चोंबडेपणा कारणीभूत; 'सामना'तून शरद पवारांवर खरमरीत टीका

आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकसित करण्याकडे गोव्याचे लक्ष - राणे

उद्योगामध्ये अप्रेंटिसशिपची सुविधा असली पाहिजे. मात्र कोणत्या उमेदवाराला संधी दिली जावी, यामध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही, असे राणे म्हणाले. गोवा शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यावर आमचा भर आहे. अनेक देशांशी याबाबत बोलने सुरु आहेत. सीआयआय, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स या सारख्या संस्थांशी सामंजस्य करार करून त्यांना संचालक मंडळात स्थान देण्यात आले असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले आहे.

Intro:पणजी : जशी व्यवसायाची व्याख्या बदलत आहे, तसेच यंत्रांमद्येही बदल होत आहे. यासाठी बदलते कौशल्य अंगी असले पाहिजे. यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याकडे गोवा सरकारचा कल आहे, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास मंत्री विश्वजीत राणे यांनी आज केले.

Body:गोवा सरकारतर्फे आज प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत अँप्रेंटशिप पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सीआयआय गोवाचे अध्यक्ष ललित सारस्वत, खात्याचे संचालक दीपक देसाई, एमएसडीईच्या सहाय्यक सल्लागार सुनिता संघी, गौरव कपूर, कँ. कैलाश चंद आदी उपस्थित होते. राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना राणे म्हणाले, कौशल्य विकासाला प्राधान्य देत खाते आणि उद्योग क्षेत्र यामधील अंतर भरून काढण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. याला उद्योग क्षेत्राचेही सहकार्य आवश्यक आहे. गोवा सरकार यासाठी डिसेंबर महिन्यात परिषद घेणार आहे. ज्यामुळे किमान दोन ते अडीच टक्के लोकांना रोजगार मिळेल असे कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
उद्योगामध्ये अँप्रेंटशिप सुविधा असली पाहिजे. मात्र, कोणत्या उमेदवाराला संधी दिली जावी, यामध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही, असे सांगून राणे म्हणाले, गोवा शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यावर आमचा भर आहे.. अनेक देशांशी बोलणी सुरु आहेत. सीआयआय, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स या सारख्या संस्थांशी सामंजस्य करार करून त्यांना संचालक मंडळात स्थान देण्यात आले आहे.
व्यवसायाची व्याख्या बदलत आहे. हे विचारात घेतले पाहिजे, असे सांगत राणे म्हणाले, यंत्र बदलते तेव्हा बदलते कौशल्य उपयोगी ठरते. राज्यातील खाण उद्योग बंद आहे. तो सुरू होईपर्यंत रोजगार आणि जीवनस्तर राखण्यासाठी अशा कौशल्याची आवश्यकता आहे. लोकांनी याकडे बदलण्याची द्रुष्टी बदलली पाहिजे. ज्यामुळे लघु उद्योगानाही कुशल कामगार मिळण्यास मदत होईल.

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.