ETV Bharat / city

गोवा मराठी चित्रपट महोत्सवातील कृतज्ञता पुरस्कारासाठी सुमित्रा भावे यांची निवड

author img

By

Published : Jun 8, 2019, 11:06 PM IST

' गोवा मराठी चित्रपट महोत्सव' २८ ते ३० जून दरम्यान पणजी आणि वास्को या शहरांत होणार आहे. यावेळी चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांना 'कृतज्ञता' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मराठी संगीत रंगभूमीची जडणघडण आणि तिचे चित्रपट सृष्टीसाठी योगदान यावर आधारित एक विशेष कार्यशाळा या महोत्सवात आयोजित करण्यात आली आहे.

गोवा मराठी चित्रपट महोत्सव

पणजी - गोव्यातील चित्रपट रसिकांना नवनव्या मराठी चित्रपटांची मेजवानी देणारा विन्सन वर्ल्डचा ' गोवा मराठी चित्रपट महोत्सव' २८ ते ३० जून दरम्यान पणजी आणि वास्को या शहरांत होणार आहे. यावेळी चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांना 'कृतज्ञता' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पणजीतील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विन्सन वर्ल्डचे ज्ञानेश मोघे यांनी सांगितले की, बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई रांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच त्यांचा 'विजेता' हा पहिला मराठी चित्रपट याच महोत्सवात प्रदर्शित केला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. महोत्सव काळात चित्रपट क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार असून त्यांच्या कार्यशाळा, परिसंवाद, आंतरराष्ट्रीय प्रीमियर आदी होणार आहेत. मराठी संगीत रंगभूमीची जडणघडण आणि तिचे चित्रपट सृष्टीसाठी योगदान यावर आधारित एक विशेष कार्यशाळा या महोत्सवात आयोजित करण्यात आली आहे.

गोवा मराठी चित्रपट महोत्सव

संजय शेटये म्हणाले की, महोत्सवाचे हे १२ वे वर्ष असून या निमित्ताने आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे. गोव्यातील मराठी चित्रपट महोत्सव देश-विदेशात पोहचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महोत्सव काळात पणजी आणि वास्को शहरांत चित्रपट प्रदर्शित होतील. यासाठी ऑनलाइन नोंदणी पुढील आठवड्यात सुरु केली जाणार आहे.
या महोत्सवात मराठीतील प्रदर्शित झालेले तर काही प्रदर्शनाच्या मार्गावर असलेले चित्रपट दाखविले जातात. त्यामुळे चित्रपट आणि कलाकारांना भेटण्यासाठी गोमंतकीय मोठ्याप्रमाणात महोत्सवात सहभागी होत असतात.
यावेळी श्रीपाद शेटये, उदय म्हांब्रो आदी उपस्थित होते.

Intro:पणजी : गोव्यातील चित्रपट रसिकांना नवनव्या मराठी चित्रपटांची मेजवानी देणारा विन्सन वर्ल्डचा ' गोवा मराठी चित्रपट महोत्सव' 28 ते 30 जून दरम्यान पणजी आणि वास्को या शहरांत होणार आहे. यावेळी चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे यांना 'क्रुतज्ञता' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Body:पणजीतील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विन्सन वर्ल्डचे ज्ञानेश मोघे यांनी सांगितले की, बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई रांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच त्यांचा 'विजेता' हा पहिला मराठी चित्रपट याच महोत्सवात प्रदर्शित केला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. महोत्सव काळात चित्रपट क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित राहणार असून त्यांच्या कार्यशाळा, परिसंवाद, आंतरराष्ट्रीय प्रीमियर आदी होणार आहेत. मराठी संगीत रंगभूमीची जडणघडण आणि तिचे चित्रपटस्रूष्टीसाठी योगदान यावर आधारित एक विशेष कार्यशाळा या महोत्सवात आयोजित करण्यात आली आहे.
तर संजय शेटये म्हणाले की, महोत्सवाचे हे 12 वे वर्ष असून या निमित्ताने आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे. गोव्यातील मराठी चित्रपट महोत्सव देश-विदेशात पोहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महोत्सव काळात पणजी आणि वास्को शहरांत चित्रपट प्रदर्शित होतील. यासाठी ऑनलाइन नोंदणी पुढील आठवड्यात सुरु केली जाणार आहे.
या महोत्सवात मराठीतील प्रदर्शित झालेले तर काही प्रदर्शनाच्या मार्गावर असलेले चित्रपट दाखविले जातात. त्यामुळे चित्रपट आणि कलाकारांना भेटण्यासाठी गोमंतकीय मोठ्याप्रमाणात महोत्सवात सहभागी होत असतात.
यावेळी श्रीपाद शेटये, उदय म्हांब्रो आदी उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.