ETV Bharat / city

गोव्यातील औद्योगिक वसाहती 'अल्कोहोल मुक्त'; उद्योगमंत्री विश्वजीत राणेंची माहिती

गोव्यातील औद्योगिक परिसर क्षेत्रात दारूच्या दुकानांना परवानगी न देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. स्वच्छ आणि हरित गोव्याबरोबर लोकहिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याची माहिती गोव्याचे उद्योगमंत्री विश्वजीत राणे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

author img

By

Published : Oct 29, 2019, 4:14 PM IST

उद्योगमंत्री विश्वजीत राणे

पणजी - गोव्यातील औद्योगिक परिसर क्षेत्रात दारूच्या दुकानांना (बार) परवानगी न देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. स्वच्छ आणि हरित गोव्याबरोबर लोकहिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याची माहिती गोव्याचे उद्योग मंत्री विश्वजीत राणे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

लोकहित आणि कामगारांची सुरक्षा राखण्यासाठी प्रत्येक औद्योगिक वसाहत 'अल्कोहोल मुक्त' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कामगार सुरक्षेसंबंधी उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीमध्ये दारू विक्रीचा विपरीत परिणाम उद्योगावर होत असून राज्यातील 22 औद्योगिक वसाहती अल्कोहोल मुक्त करण्याची गरज आहे. तसेच हरित गोवा राखण्यासाठी प्रत्येक उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलेल्या अटींचे पालक करणे बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन करण्यात आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मंडळाला देण्यात आले आहेत, असे ट्विट राणे यांनी केले आहे. या दोन्ही निर्णयांमुळे गोव्याचा विकास साधण्यासाठी अधिक मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्र्यांकडून रुग्णसेवेचे अभिनंदन

दिवाळीनिमित्त आपली सेवा कायम करत 108 या आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 1171 जणांना सेवा दिली. यामध्ये 207 रुग्णांना अतिदक्षतेची आवश्यकता असताना त्यांना सेवा पुरवण्यात आल्याची माहिती राणे यांनी दिली. या सर्व कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

Intro:पणजी : स्वच्छ आणि हरित गोव्याबरोबर लोकहिताचा विचार करत यापुढे गोव्यातील औद्योगिक क्षेत्र परिसरात दारू दुकानाना (बार) परवानगी न देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे, अशी माहिती गोव्याचे उद्योग मंत्री विश्वजीत राणे यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

Body:राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, लोकहीत आणि कामगारांची सुरक्षा राखण्यासाठी प्रत्येक औद्योगिक वसाहत अल्कोहोल मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार सुरक्षा महत्त्वाची असलेल्या उदिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील. औद्योगिक वसाहतीमध्ये दारू विक्रीचा परिणाम बाजूचि उद्योगावर होत असतो. राज्यातील 22 औद्योगिक वसाहती अल्कोहोल मुक्त करण्याची गरज आहे.
तसेच हरित गोवा राखण्यासाठीप्रत्येक उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितलेल्या अटींचे पालक करणे बंधनकारक आहे. जर त्याचे उल्लंघन करण्यात आले तर संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मंडळाला देण्यात आले आहेत, असेही ट्विट राणे यांनी केले आहे.
या दोन्ही निर्णयामुळे गोव्याचा विकास साधण्यासाठी अधिक मद होईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, रविवारी दिवाळी सणा दिवशीही आपली सेवा कायम करत 108 या आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांनी 1171 जणांना सेवा दिली. ज्यामध्ये 207 रुग्णांना अतिदक्षतेची आवश्यकता असलेले होते. या सर्व कर्मचाऱ्यांचे राणे यांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्याच कडे आरोग्य खाते आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.