ETV Bharat / city

गोव्यात तीन ठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन करणार - उद्योग मंत्री राणे - गोवा विधानसभा पावसाळी अधिवेशन

किमान दहा हजार गोमंतकियांना रोजगार देण्यासाठी गोव्यात तीन ठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन करणार आहे. अशी माहिती गोव्याचे उद्योग मंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभा अधिवेशनात दिली आहे.

गोव्यात तीन ठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन करणार - उद्योग मंत्री विश्वजीत राणे
author img

By

Published : Jul 20, 2019, 11:46 PM IST

पणजी - गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. काँग्रेस आमदार रेजिनाल्ड यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत असताना राणे यांनी सरकार रोजगार प्रश्न सोडवण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. काँग्रेस आमदार रेजिनाल्ड यांनी सरकार रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना करत आहेत? असा प्रश्न विचारला होता. त्यावर राणे यांनी कोणकोणत्या ठिकाणी नवे औद्योगिक वसाहत उभारले जातील व कोणते उद्योग उभारण्यास प्राधान्य दिले जाईल, हे स्पष्ट केले.

राणे यांनी लेखी उत्तरात दिलेल्या माहिती अनुसार, उत्तर गोव्यातील मावळींगे-सत्तरी येथे 1 लाख 38 हजार 125 चौरस मीटर क्षेत्रात, शिरसई-बार्देश येथे 8 लाख 65 हजार, 105 चौरस मीटर क्षेत्रात तर दक्षिण गोव्यातील पैंगीण-काणकोण मध्ये 3 लाख 86 हजार 488 चौरस मीटर क्षेत्रात नव्या औद्योगिक वसाहती उभारण्यात येतील. मात्र, अद्याप कोणत्याही उद्योगाला जागा देण्यात आलेली नाही. या ठिकाणी प्रदुषण विरहित असे औषध निर्मिती आणि बायोटेक प्रकल्प उभारण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

गोवा सरकार स्थानिकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी तीन ठिकाणी नव्या औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहे. ज्यामुळे किमान 10 हजार गोमंतकीयांनी रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती उद्योग मंत्री विश्वजीत राणे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पावरील भाषणाचे वाचन केले. त्यानंतर अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेत शुक्रवारी रोजगार क्षेत्रावरही चर्चा करण्यात आली.

Intro:पणजी : गोव्यात स्थानिकांना रोजगार देत्यासाठी सरकार प्रयत्नशील असून तीन ठिकाणी नव्या औद्योगिक वसाहती उभारण्यात येतील. ज्यामुळे किमान 10 हजार गोमंतकियांनी रोजाग उपलब्ध होईल. अशी माहिती उद्योग मंत्री विश्वजीत राणे यांनी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात दिली.

Body:सध्या गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पावरील भाषणाचे वाचन केले. त्यानंतर त्यावरील चर्चेच्या अनुषंगाने शुक्रवारी रोजगार चर्चा झाली.
काँग्रेस आमदार रेजिनाल्ड यांनी सरकार रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी काय उपाययोजना करत आहेत? असा प्रश्न विचारला होता. त्यावर राणे यांनी कोणत्या ठिकाणी नवे औद्योगिक वसाहत उभारून कोणते उद्योग उभारलण्याला प्राधान्य दिले जाईल, हे स्पष्ट केले.
राणे यांनी दिलेल्या उत्तरानुसार उत्तर गोव्यातील मावळींगे-सत्तरी येथे 1 लाख 38 हजार 125 चौरस मीटर क्षेत्रात, शिरसई-बार्देश येथे 8 लाख 65 हजार, 105 चौरस मीटर क्षेत्रात तर दक्षिण गोव्यातील पैंगीण-काणकोण मध्ये 3 लाख 86 हजार 488 चौरस मीटर क्षेत्रात नव्या औद्योगिक वसाहती उभारण्यात येतील. मात्र, अद्याप कोणत्याही उद्योगाला जागा देण्यात आलेली नाही.
या ठिकाणी प्रदुषण विरहित असे औषध निर्मिती आणि बायोटेक प्रकल्प उभारण्याला प्राधान्य दिले जाईल, असेही म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.