पणजी - गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद तथा भाऊसाहेब बांदोडकर यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त त्यांना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आदरांजली वाहिली. मिरामार येथील त्यांच्या समाधीस्थळावर पुष्प वाहून गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
हेही वाचा... यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात
पोर्तुगीजांपासून मुक्ती मिळाल्यानंतर दयानंद बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. भाऊसाहेब या नावाने बांदोडकरांना गोव्यात ओळखले जात असे. 12 मार्च हा त्यांचा ज्मदिवस. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना गोवा विधानसभा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आदरांजली वाहिली. यावेळी आमदार सुदीन ढवळीकर, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी आमदार नरेश सावळ यांच्यासह यतीन काकोडकर, मगोचे कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.
-
My respectful tributes to Goa's first Chief Minister Dayanand (Bhausaheb) Bandodkar on his birth anniversary. pic.twitter.com/iQ8VIxT8zW
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) March 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My respectful tributes to Goa's first Chief Minister Dayanand (Bhausaheb) Bandodkar on his birth anniversary. pic.twitter.com/iQ8VIxT8zW
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) March 12, 2020My respectful tributes to Goa's first Chief Minister Dayanand (Bhausaheb) Bandodkar on his birth anniversary. pic.twitter.com/iQ8VIxT8zW
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) March 12, 2020
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील ट्वीट करत भाऊसाहेब बांदोडकरांना अभिवादन केले आहे.