ETV Bharat / city

Goa Election 2022 : सुदिन ढवळीकरांचा मुख्यमंत्री पदावर दावा; चिदंबरम यांच्याशी केली चर्चा - गोवा मराठी बातमी

गोवा निवडणुकीचा उद्या ( गुरुवार ) निकाल हाती येणार ( Election 2022 ) आहे. त्यापूर्वीच सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्याचपार्श्वभुमीवर सुदिन ढवळीकरांनी पी चिदंबरम यांच्याशी चर्चा केली ( Sudin Dhavalikar And P Chidambaram Meeting ) आहे.

Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar
author img

By

Published : Mar 9, 2022, 9:40 AM IST

Updated : Mar 14, 2022, 12:48 PM IST

पणजी - गुरुवारी गोवा विधानसभेचे ( Goa Election 2022 ) निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, राज्यात काँग्रेस किंवा भाजपालाच पूर्ण बहुमत प्राप्त होणार नाही. हे सध्याच्या एक्झिट पोल वरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ( Maharashtrawadi Gomantak Party ) सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे आखले आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आता सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. जर, राज्यात सत्ता स्थापन करायची असेल तर भाजप किंवा काँग्रेसने आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी घेतली आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दोन्ही पक्षांना दिला आहे.

मगोप नेते सुदिन ढवळीकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

ढवळीकरांची चिदंबरम यांनी घेतली भेट

मगो पक्षाने काँग्रेसला पाठिंबा द्यावा यासाठी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मंगळवारी सुदिन ढवळीकरांची भेट ( Sudin Dhavalikar And P Chidambaram Meeting ) घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत सुमारे तासभर चर्चा झाली असून, आगामी सत्ता स्थापनेच्या बाबतीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.

आमचे दरवाजे सर्वांना मोकळे

राज्यात सत्ता स्थापन करायची असेल तर काँग्रेस आणि भाजपला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दरवाजे खुले आहेत. जो आमच्यासोबत येईल त्याला आपण सोबत नेणार असल्याचे सांगत एकप्रकारे ढवळीकर यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. यासाठी त्यांनी दोन्ही पक्षांना चर्चेसाठी आवाहन केले आहे.

हेही वाचा - Pravin Chavan Reply : फडणवीसांनी केलेले आरोप खोटे, चौकशीला सामोरे जायला तयार - विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण

Last Updated : Mar 14, 2022, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.