पणजी (गोवा) - भाजप सरकार फक्त आपल्या उद्योजक मित्रांसाठी काम करून त्यांचे भले करत आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी ( Priyanka Gandhi Vadra Criticism on BJP ) यांनी केला. शुक्रवारी (दि. 10) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ( Goa Election 2022 ) त्या गोव्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
विकासाच्या प्रकल्पामुळे उद्योगपतींचे झाले भले
भाजपने उद्योगपतींचे भले केले. भाजपने राज्यात विकास प्रकल्प आणून त्याचा फायदा उद्योगपतींना केला. भाजपने गोव्यात विकासाचे प्रकल्प आणले. मात्र, त्यात उद्योगपतींना फायदा झाला. यामुळे सामान्य गोवेकर भिकेला लागल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले.
विनाशकारी प्रकल्पापासून गोव्याला वाचवायचे
रेल्वेचे दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग, कोळसा वाहतूक यांच्यामुळे गोव्याच्या पर्यावरणाचा नाश होणार आहे. मोलेमचे कित्येक हेक्टर वन नष्ट होणार आहे. याचा परिणाम जगप्रसिद्ध दूधसागर धबधब्यावरही होणार आहे. त्यामुळे हे विकासाचे विनाशकारी प्रकल्प गोव्याच्या निसर्गाचा ऱ्हास करणार आहेत. म्हणून भाजपापासून गोव्याला वाचवायचे असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन या प्रकल्पांना हद्दपार करण्याची गरज असल्याचेही प्रियांका गांधी म्हणाल्या.
इंदिरा गांधींनी गोव्याच्या समस्या जाणून घेतल्या होत्या
पोर्तुगीजांच्या गुलामगिरीतून भारत स्वातंत्र झाल्यावर इंदिरा गांधी यांनी जनमताचा कौल घेतला. त्यांना महाराष्ट्र किंवा स्वतंत्र गोव्याचा निर्णय घेण्याचा अधिकार दिला. त्यावेळी गोवेकारांनी स्वतंत्र गोव्याचा नारा दिला , हे सर्व संवादामुळे शक्य झाले. मात्र, सध्य तो संवाद घडत नाही. जेव्हा दोन्ही बाजूनी संवाद घडतो, त्यावेळी जनतेचा विकास होत असतो. मात्र, भाजपा सरकारच्या काळात हा संवाद हरवत चालल्याचे गांधी म्हणाल्या.
तृणमुल आणि आपवरही गांधींचा निशाणा
राज्यात काँग्रेस हा जुना पक्ष आहे. फक्त काँग्रेसमुळेच राज्याचा विकास झाला आहे. मात्र, भाजपला आपला पराभव जवळ दिसत असल्यामुळे मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपने बाहेरच्या पक्षांचा आधार घेतला आहे. भाजपच्या कृपेने हे पक्ष राज्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा - उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-काँग्रेसची युती..?