ETV Bharat / city

ब्रिटनहून आलेल्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - गोवा राज्य विकास आराखडा2021

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्याचा शिरकाव होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. 9 डिसेंबर पासून आतापर्यंत गोव्यात दाखल झालेल्या 900 प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 37 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर त्यांच्या संपर्कातील 23 पॉझिटिव्ह आढळले. यामधील 43 जणांचे अहवाल पुण्याला पाठविण्यात आले आहे.

goa
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
author img

By

Published : Dec 31, 2020, 9:32 AM IST

Updated : Dec 31, 2020, 11:44 AM IST

पणजी - ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर तेथून गोव्यात आलेल्या सर्व प्रवाशांचे नमुने तपासण्या आले आहेत. 900 पैकी 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अधिक तपासणीसाठी त्यांचे स्वॅब पुणे येथील व्हायरालॉजी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी दिली. आल्तिनो-पणजी येथील 'महालक्ष्मी' निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोरोना प्रादुर्भावामुळे 2020 हे वर्ष खुप आव्हानात्मक होते. तरीही मोठ्याप्रमाणात केंद्र सरकारच्या योजना राबविण्यात गोवा सरकार यशस्वी ठरले आहे, असे सांगत वर्षभारातील कामाचा आढावा देखील सावंत यांनी यावेळी मांडला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल पुण्याला-

डॉ. सावंत म्हणाले, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात येतात. त्यामुळे विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आज, उद्या आणि परवा मोठ्याप्रमाणात जाग्रुती करण्यात येत आहे. लोकांनी केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, यासाठी पोलिसांमार्फत प्रयत्न केले जात आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. त्याचा शिरकाव होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. 9 डिसेंबर पासून आतापर्यंत गोव्यात दाखल झालेल्या 900 प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 37 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर त्यांच्या संपर्कातील 23 पॉझिटिव्ह आढळले. यामधील 43 जणांचे अहवाल पुण्याला पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत दोन अहवाल मिळाले जे निगेटिव्ह आहेत. तरीही सरकार सर्व प्रवाशांवर लक्ष ठेवून आहे.

औषध निर्मिती विभागाची कामगिरी-

2020 मधील सरकारी कामाचा आढावा घेताना डॉ. सावंत म्हणाले, कोविड-19 मुळे हे वर्ष खुपच आव्हानात्मक होते. महसूलावर परिणाम झाला. परंतु, त्यामुळे एकही सरकारी योजना बंद होऊ दिली नाही. तर 2019 च्या तुलनेत केंद्र सरकारच्या योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्या. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळा, रुग्णालय कमी कालावधीत उभारणी करण्यात आली. विदेशात असलेल्या गोमंतकीय खलाशांना मोठ्याप्रमाणात परत आणण्यात आले. औद्योगिक क्षेत्र बंद असताना येथील औषध निर्मिती विभाग सुरू होता. ज्यामुळे सॅनिटायझर, पीपीई किट आणि औषधे तयार करण्यात आली. ती देशाबरोबर विदेशातही पाठविण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली. या काळात 1 लाख 20 हजार परराज्यातील कामगार आपल्या गावी परतले. त्यांना जाण्यासाठी सरकारने सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नव्या पर्यटन धोरणाला मंजूरी-

याच काळात सरकारने नव्या पर्यटन धोरणाला मंजुरी दिली, असे सांगून मुख्यमंत्री सावंत म्हणाले, एम्प्लॉयमेंट एक्सेंजच्या माध्यमातून खासगी उद्योगानांही जोडण्यात आहे. तर 10 हजारांहून अधिक शिक्षकांना ई-शिक्षण कसे द्यावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. नवे दळणवळण धोरण निश्चित करण्यात आले. ज्यामुळे 90 ठिकाणी नवे मनोरे उभारण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी प्रस्ताव सादर केले आहे. स्वयंपूर्ण गोवा करत असतानाच सरकारचा निर्यात वाढविण्याकडे कल असून गोव्यातील 15 ते 20 उत्पादनांना जिओग्राफिकल इंडिकेटर मानांकन मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

१६ जानेवारीपासून इप्फी-

तसेच शेती विकासाला चालना देण्यात आली आहे. ज्यामुळे पुढील वर्षभारात किमान 50 टक्के गोवा शेतमालाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. पारंपरिक हस्तकला यांनाही प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्र सरकारने स्वदेश दर्शन अंतर्गत डिचोली, सांगे आणि काणकोण परिसराला मंजुरी दिली आहे. 'इफ्फी' व्हर्च्युअल पद्धतीने गोव्यात होणारा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) कोविडमुळे यावर्षी नोव्हेंबर महिन्यात होऊ शकला नाही. तो 16 जानेवारी पासून व्हर्च्युअल प्रकारे साजरा करण्यात येईल, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

खाजगी विद्यापीठ विधेयक मंजूर-

गोवा सरकारने खाजगी विद्यापीठ विधेयक मंजूर केले आहे. त्यासाठी प्रस्ताव आले आहेत, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, यावर्षी 10 वी, 12 वी आणि अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑफलाइन होतील. अन्य परीक्षा ऑनलाइन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Last Updated : Dec 31, 2020, 11:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.