ETV Bharat / city

Goa CM Pramod Sawant Prediction : 20 पेक्षा जास्त जागा मिळून आम्ही पुन्हा सरकार स्थापन करणार - गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

14 फेब्रुवारीला गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. ( Goa Assembly Election 2022 ) एकूण 80 टक्के मतदान मतदान झाले. सर्वाधिक मतदान साखळी मतदासंघात झाले. आम्हाला 20पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत, याबाबत आम्हाला विश्वास आहे आणि पुन्हा आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले आहेत. ( Goa CM Pramod Sawant Prediction )

pramod sawant
प्रमोद सावंत
author img

By

Published : Feb 16, 2022, 9:45 PM IST

पणजी (गोवा) - आम्हाला 20पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत, याबाबत आम्हाला विश्वास आहे आणि पुन्हा आम्ही सरकार स्थापन करणार आहोत, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले आहेत. ( Goa CM Pramod Sawant Prediction ) यानंतर आज मुख्यमंत्री सावंत यांनी आपले मत मांडले.

Goa CM Pramod Sawant Prediction
एएनआयने दिलेले ट्विट.

14 फेब्रुवारीला गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. ( Goa Assembly Election 2022 ) एकूण 80 टक्के मतदान मतदान झाले. सर्वाधिक मतदान साखळी मतदासंघात झाले. त्याखालोखाल मांद्रे, पेडणे, सांगे, कानकोण, केपेम, मये, मुरंगाव या मतदारसंघात 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. यानंतर गोव्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी 10 मार्च 2022 रोजी प्रचंड जनादेश मिळण्याचा विश्वास व्यक्त केला.

दिगंबर कामत- माजी मुख्यमंत्री

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस मडगावचे उमेदवार दिगंबर कामत यांनी नमूद केले की, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी आघाडीच्या बाजूने बदल होऊन पुढील सरकार स्थापन होईल, असा मला विश्वास आहे.

मायकल लोबो

मायकल लोबो यांनी माहिती दिली की, ते ज्या पक्षाचा भाग आहेत ते सरकार स्थापन करतील.

उत्पल पर्रीकर

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आणि पणजीतील अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना पणजीतील मतदार त्यांच्यासारख्या पुरोगामी आणि प्रामाणिक उमेदवाराला मतदान करतील, असा विश्वास आहे.

अमित पालेकर

आपचा मुख्यमंत्री चेहरा आणि सेंट क्रुझचे उमेदवार अमित पालेकर म्हणाले की, 'आप' सारख्या नवीन पक्षाने सरकार स्थापन केल्याने गोव्याच्या कारभारात बदल होईल, असा मला विश्वास आहे.

किरण कंडोळकर

गोवा टीएमसीचे अध्यक्ष आणि अल्डोनाचे उमेदवार किरण कांदोळकर म्हणाले की, मतदार टीएमसी आणि एमजीपी युतीला सत्तेवर निवडून देतील यावर मला विश्वास आहे.

सुदिन ढवळीकर

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षचे उमेदवार सुदिन ढवळीकर, माजी मुख्यमंत्री मंद्रेमचे अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर आणि इतरांनी गोवा विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.