ETV Bharat / city

खा, प्या, मजा करा पण पर्यावरण संवर्धनही करा; किंग मोमोचा संदेश

शालोम सार्दिन हे यावर्षीच्या गोवा कार्निव्हलचे किंग मोमो आहेत. त्यांची ही दुसरी वेळ आहे. गोवा कार्निव्हलच्या उद्घाटन प्रसंगी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन उपस्थित होते.

goa
खा, प्या, मजा करा पण पर्यावरण संवर्धनही करा; किंग मोमोचा संदेश
author img

By

Published : Feb 23, 2020, 10:21 AM IST

पणजी - खा, प्या, मजा करा परंतु, पर्यावरणाचेही भावी पिढ्यांसाठी संवर्धन करण्याची दक्षता घ्या, असा संदेश गोवा कार्निव्हलच्या किंग मोमोने गोमंतकीयांना दिला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी झेंडा दाखविल्यानंतर कार्निव्हलच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला.

खा, प्या, मजा करा पण पर्यावरण संवर्धनही करा; किंग मोमोचा संदेश

हेही वाचा - दिल्ली भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची वर्षावर तातडीची बैठक, शरद पवारांसह अजित पवारांची उपस्थिती

शालोम सार्दिन हे यावर्षीच्या गोवा कार्निव्हलचे किंग मोमो आहेत. त्यांची ही दुसरी वेळ आहे. गोवा कार्निव्हलच्या उद्घाटन प्रसंगी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की गोव्यात सर्वधर्मसमभावाने लोक नांदतात. कार्निव्हल अथवा शिमगोत्सव मिरवणूक ही गोमंतकीयांच्या एकीची प्रतिके आहेत. काही शक्ती धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी आम्ही मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या संसर्गाचा भारतीय उद्योगासह पर्यटनावर परिणाम, इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार

यावेळी चित्ररथाला झेंडा दाखविल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह महापौर चालत रथयात्रेत सहभागी होत लोकांचे अभिवादन स्वीकारत होते. या रथयात्रेत हजारो लोक गोव्याच्या कानाकोपऱ्यातून कार्निव्हलमधील चित्ररथ पाहण्यासाठी उपस्थित होते. यासाठी महापालिका आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाने खास व्यवस्था केली होती. तसेच रस्त्याच्या दूतर्फा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.