ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : गोव्यात त्रिशंकू विधानसभा होणार की भाजपला पूर्ण बहुमत मिळणार? वाचा, राजकीय समीकरणं

गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) साठी बिगुल वाजले आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अनेकवेळा गोव्यात त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) झाली होती. मात्र, यावेळी त्रिशंकू होणार की भाजपला पूर्ण बहुमत मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार (Goa to vote on February 14) आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळणार आहे.

goa election file photo
गोवा निवडणूक फाईल फोटो
author img

By

Published : Feb 3, 2022, 8:21 PM IST

Updated : Feb 4, 2022, 12:51 PM IST

पणजी - गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) साठी बिगुल वाजले आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष या जुन्या पक्षांसोबतच टीएमसी, आरजीपी, जय महाभारत पार्टी, गोएंचो स्वाभिमान पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांनीही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार (Goa to vote on February 14) आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळणार आहे. त्यामुळे भाजपला पूर्ण बहुमत मिळणार की त्रिशंकू विधानसभा (Hung Assembly in Goa) होणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

  • अनेकदा विधानसभा राहिली त्रिशंकू -

प्रादेशिक पक्षांच्या दमदार कामगिरीमुळे गोव्यात अनेकदा त्रिशंकू विधानसभा झाल्या आहेत. 1999 आणि 2012 विधानसभा निवडणूक निकाल याला मात्र अपवाद आहेत. 1999 मध्ये काँग्रेसला 21 तर भाजपला 2012 मध्ये 21 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर येथील पक्षांतराचे वातावरण आणि निवडणुकीनंतरचे नवे समीकरणं जुळत गेली.

गोव्यातील 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. पण सरकार स्थापन करण्यास भाजप यशस्वी झाले. त्यावेळी मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, पर्रीकर यांना कर्करोगासारख्या आजाराने ग्रासले, तरीही त्यांचे निधन होईपर्यंत म्हणजे 17 मार्च 2019 पर्यंत ते मुख्यमंत्री पदावर होते. त्यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यात आले आणि भाजप सध्या त्यांच्याबरोबर निवडणूक लढत आहे.

गोव्याच्या राजकीय इतिहासाचा विचार केला असता. 1987 मध्ये गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला आणि प्रतापसिंह राणे हे पहिले गोव्याचे मुख्यमंत्री बनले. प्रतापसिंह राणे असताना तत्कालीन विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने विजय मिळवला आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण ही विधानसभा केवळ ३ वर्षे चालली. त्यानंतर गोव्यात सहाव्या विधानसभेत 1989 मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यानंतर गोव्यात पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार बनले आणि चर्चिल अलेमाओ मुख्यमंत्री झाले.

goa election
गोवा विधानसभेचा इतिहास
  • काँग्रेस-AAP ने दिली उमेदवारांना शपथ -

गोवा निवडणूक जसजशी जवळ येईल तशी या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात उड्या मारणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आपला गड ढासळण्याची धास्ती सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे. गोव्यात काँग्रेसने भाजपला लागलेली गळती पाहून लगेच सावध पवित्रा घेतला आणि आपल्या उमेदवारांना पक्ष न बदलण्याच्या शपथा दिल्या. त्यानंतर गोव्यात आम आदमी पार्टीनेही काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकत, आपल्या सर्व उमेदवारांना न फूटण्याची शपथ दिली आहे. तसेच सर्व उमेदवारांच्या कायदेशीर प्रतिज्ञापत्रावर सह्या घेतल्याचीही माहिती आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे.

  • जातीनुसार गोव्याचे राजकारण -

गोव्याची लोकसंख्या ही 2011 च्या जनगणनेनुसार 18.2 लाख आहे. यामध्ये निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार गोव्यात मतदारांची संख्या ही 11.10 लाख आहे. गोव्यातील एकूण लोकसंख्या पाहता एकूण लोकसंख्येत 35 ते 40 टक्के लोकसंख्या ही भंडारी समाजाची आहे. गोव्यामध्ये ओबीसी समाजामध्ये 19 घटक आहेत. त्यांच्या लोकसंख्येचा विचार केल्यास त्यामध्ये 60 टक्के समाज हा भंडारी आहे. ओबीसी समाज हा गोव्यातील सर्वात मोठा घटक आहे. गोव्यात 65 टक्के हिंदू समाज असून 25 टक्के समाज हा ख्रिश्चन आहे. 7 ते 8 टक्के लोकसंख्या ही मुस्लिम समाजाची आहे.

  • AAP ने भंडारी समाजाचा चेहरा दिला मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार -

'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भंडारी समाजाचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी दिला आहे. गोव्यात 'आप'ची सत्ता आल्यास भंडारी समाजाचा मुख्यमंत्री करण्याची अरविंद केजरीवाल यांच्या घोषणेनंतर जातीचे राजकारण आणि व्होट बँकेची चर्चा सुरू झाली. तसेच केजरीवाल यांनी अमित पालेकर यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा देखील केली.

  • गोव्यातील जातीय राजकारण -

2014 मध्ये केलेल्या गोवा राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणानुसार, राज्यातील ओबीसी लोकसंख्या 3,58,517 होती, जी एकूण लोकसंख्येच्या 27 टक्के आहे. यानुसार भंडारी समाजाची एकूण संख्या २,१९,०५२ आहे, जी ओबासी लोकसंख्येच्या ६१.१० टक्के आहे. मात्र, गोव्यात आजवर जातीच्या राजकारणाचा वरचष्मा राहिलेला नाही.

  • AAP आणि तृणमूल काँग्रेस मैदानात -

यावेळी आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणूक रंजक बनवली आहे. दोन्ही पक्षांनी विजयासाठी ताकद पणाला लावली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने गोव्यात जोरदार प्रयत्न केले होते. त्यावेळी त्यांचा उमेदवार जिंकून आला नाही मात्र, त्यांना 3.5 टक्के मते मिळाली होती, तर २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने उमेदवार उभे केले होते, त्यावेळी त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यांना 1.81 टक्के मते त्यावेळी मिळाली होती. मात्र, 2022 च्या निवडणुकीत जिंकण्यासाठी या दोन्ही आपली ताकद पणाला लावली आहे.

  • गोवा विधानसभा निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे -

1) गोव्यात यावेळी 10 राजकीय पक्ष 40 विधानसभेच्या जागांसाठी 5 आघाडीसह रिंगणात आहेत. एनडीएमध्ये भाजपसोबत कोणताही पक्ष नाही. भाजप एकट्या 40 जागांवर निवडणूक लढवत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत.

2) आम आदमी पार्टी 39 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर एक जागा चंद्रकांत शेट्ये यांच्या समर्थनार्थ सोडण्यात आली आहे.

3) तृणमूल काँग्रेसने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी युती केली आहे. TMC 26 जागांवर तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) 13 जागांवर निवडणूक लढवत आहे. एमजीपीचे नेतृत्व सुधीन धानविलकर यांच्याकडे आहे, तर टीएमसीने महुआ मोइत्रा यांच्याकडे निवडणुकीची कमान सोपवली आहे.

4) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेने गोव्यातही आघाडी केली आहे. या आघाडीने मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा दिला आहे. ते सध्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेने 9 तर राष्ट्रवादीने 11 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

goa election
गोव्यातील लोकसंख्या
  • कधी आहे मतदान आणि निकाल?

गोवा विधानसभा निवडणूक 2022 साठी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. गोव्यात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार की त्रिशंकू विधानसभा होणार हे 10 मार्चला कळेल. आतापर्यंतच्या सर्वेक्षणात भाजप हे आघाडीवर आहे. मात्र, उमेदवारांची संख्या आणि राजकीय पक्षांचे दावे लक्षात घेता जनमत चाचण्यांवर विश्वास ठेवणे कठीण आहे.

Last Updated : Feb 4, 2022, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.