पणजी - राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात दाखल होतात. मात्र, गडकरी यांचा हा राजकीय दौरा मात्र विशेष आहे. या गोवा भेटीत ते राज्यातील महत्वाच्या विकास प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. त्यांच्या या राजकीय दौऱ्यामुळे भाजपासह महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. कारण, उद्या मगोचे नेते गडकरीशी युतीबाबत चर्चा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी रविवारी तसे संकेत दिले आहेत. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोवा दोऱ्यावर आहेत. आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
गडकरी आणि ढवळीकर यांची युतीवर होणार चर्चा?
राज्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या गडकरी यांची महाराष्ट्र गोमंतक पक्षाने भेट घेऊन युतीबाबत चर्चा करण्याचे संकेत रविवारी दिले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले आणि गडकरी यांचे संबंध चांगले असल्याचे सांगत भाजपाने आपल्याला 12 जागांवर निवडणूक लढविण्याची संधी दिली तर आपण त्यांच्यासोबत जाणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
गडकरी यांचा गोव्यातील दौरा -
सोमवारी सकाळी गोव्यात आगमन
सकाळी 11 वाजता लोटलीम ते वेरणा या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण.
दुपारी 12.30 वाजता गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या टेलि मेडिसिन सुविधेचा उद्घाटन सोहळा.
संध्याकाळी 6.30 वाजता गती शक्ती या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत उद्योजकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार.
केजरीवाल ही आजपासून गोवा भेटीवर -
दिल्लीचे मुख्यमंत्री आजपासून दोन दिवशीय गोव्वा दौऱ्यावर येत आहेत. या भेटीत ते गोव्यातील विविध नेते व कार्यकर्त्यांशी विभागवार भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचा - 'आयर्न लेडी' इंदिरा गांधींचा स्मृतीदिन : काँग्रेस नेते राहुल गांधींनी शक्तिस्थळी केलं अभिवादन