पणजी (गोवा) - राज्यातील निवडणुकांची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर सोपविली आहे. त्यांची गोवा राज्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे राज्यातील निवडणूक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फडणवीस सोमवारपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर दाखल झाले आहेत. आज त्यांनी पणजीतील ताज विवंता हॉटेलमध्ये भाजपा पदाधिकारी, नेते व मंत्री यांच्याशी चर्चा करून निवडणूक परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री किशन रेड्डी, श्रीमती दर्शन जार्दोश, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आदि उपस्थित होते.
२०२२ ला भाजपला मिळणार ऐतिहासिक विजय -
भाजपने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामांमुळे २०२२ च्या निवडणुकांत भाजपला ऐतिहासिक विजय प्राप्त होणार असून, इतर पक्षांकडे खंबीर नेतृत्व नसल्यामुळे राज्यातील त्यांच्याच आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे, असा खोचक टोल त्यांनी काँग्रेसला लगावला.
हे ही वाचा -भयानक.. रशियाच्या पर्म विद्यापीठात अज्ञाताचा अंदाधुंद गोळीबार, 8 जणांचा मृत्यू
काँग्रेस पक्षात अराजकता - फडणवीस
काँग्रेस पक्षात अराजकता असून कार्यकर्त्यांची मागणी असूनही काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष देऊ शकत नाहीत, त्याचे पडसाद गोव्यातही उमटत आहेत.
हे ही वाचा -अज्ञाताने रासायनिक खत टाकल्याने 200 क्विंटल कांदा सडला; औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील प्रकार
मनोहर पर्रिकरांची उणीव तर प्रमोद सावंत मुख्यमंत्री पदाचे दावेदार -
राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री यांच्या निधनानंतर भाजपा प्रथमच निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे पर्रिकरांची उणीव या निवडणुकीत भाजपला जाणवणार हे मात्र नक्की. परंतु पर्रिकरांची जागा डॉ. प्रमोद सावंत भरून काढणार काय, तसेच सावंतांच्या नेतृत्वाखाली भाजप किती यशस्वी होणार, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. तरीही भाजपने विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावावर पुढील मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब केले आहे.