ETV Bharat / city

निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे पणजीत मतदार जागृती फेरी

विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडावे. यासाठी गुरूवारी सायंकाळी पणजीत गोवा निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे मतदार जागृतीसाठी मोटारसायकल फेरी काढण्यात आली.

झेंडा दाखविताना उत्तर गोव्याचे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आर. मेनका, पणजी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी विवेक एच. पी. व अन्य
author img

By

Published : May 18, 2019, 1:00 PM IST

पणजी - विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडावे. यासाठी गुरूवारी सायंकाळी पणजीत गोवा निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे मतदार जागृतीसाठी मोटारसायकल फेरी काढण्यात आली.

माहिती सांगताना णजी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी विवेक एच. पी.

पणजी पोटनिवडणुकीत बुथस्तरीय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या या मोटारसायकल फेरीला उत्तर गोव्याचे लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आर. मेनका यांनी झेंडा दाखवला. यावेळी पणजी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी विवेक एच. पी. उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक काळात मतदान जागृतीसाठी निवडणूक आयोगातर्फे राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याचा परिणाम लोकसभा मतदानात दिसून आला.

गुरूवारच्या फेरीविषयी बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी विवेक एच. पी. म्हणाले, एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये. अधिकाधिक लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मतदारांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

Intro:पणजी : पणजी विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी घर बाहेर पडावे यासाठी आज संध्याकाळी पणजीत गोवा निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे जाते जाग्रुतीसाठी मोटारसायकल फेरी काढण्यात आली.

Body:पणजी पोटनिवडणुकित बुथस्तरीय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या या मोटारसायकल फेरीला उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा उत्तर गोवा लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी आर. मेनका यांनी झेंडा दाखवला. यावेळी पणजी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी विवेक एच. पी. उपस्थित होते.
लोकसभा निवडणूक काळात मतदान जागृतीसाठी निवडणूक आयोगातर्फे राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याचा परिणाम लोकसभा मतदानात दिसून आला.
आजच्या फेरीविषयी बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी विवेक एच. पी. म्हणाले, एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये. अधिकाधिक लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मतदारांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.