ETV Bharat / city

Goa Assembly Election 2022 : बडे नेते सपत्नीक मैदानात, गोव्यातील घराणेशाहीवर ईटीव्हीचा विशेष रिपोर्ट... - गोवा लेटेस्ट न्यूज

गल्ली असो की दिल्ली राजकारणात घराणेशाहीची परंपरा पाहायला मिळते. गोवा विधानसभा निवडणूक ही 14 फेब्रुवारीला होणार आहे. या निमित्ताने गोव्यातील घराणेशाहीवर ( Dynastic Politics in Goa ) नजर टाकणारा ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट.

गोवा विधानसभा
Goa Assembly Election 2022
author img

By

Published : Jan 27, 2022, 4:22 PM IST

पणजी - गोवा विधानसभा ( Goa Assembly Election 2022 )निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण ढवळून निघालं. गल्ली असो की दिल्ली राजकारणात घराणेशाहीची परंपरा पाहायला मिळते. गोवा विधानसभा निवडणूक ही 14 फेब्रुवारीला होणार आहे. या निमित्ताने गोव्यातील घराणेशाहीवर ( Dynastic Politics in Goa ) नजर टाकणारा ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट.

गोव्यातील घराणेशाहीवर ईटीव्हीचा विशेष रिपोर्ट...

गोवा विधानसभा निवडणूक चर्चेत आहे. प्रथमच चार जोड्या विधानसभेत आपले नशीब अजमावून घेण्यासाठी निवडणूक रिंगणात आहेत. ढवळीकर बंधू आणि आलेमाव पिता आणि कन्या या विधानसभेत आपले नशीब आजमावणार आहे.

भाजपातर्फे यंदा मोंन्सेरात व राणे, काँग्रेसतर्फे लोबों तर तृणमूल काँग्रेसने कांडोलकर दाम्पत्याला उमेदवारी केली आहे. भाजपाने पणजी मतदारसंघातून बाबुष मोन्सेरात तर त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात यांना तालीगाव मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. विश्वजित राणे यांना वालपाई तर त्यांची पत्नी डॉ विद्या राणे यांना पर्यें मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसने नुकतेच भाजपला रामराम ठोकून पक्षात आलेल्या मायकल लोबो यांना कलंगुट तर त्यांची पत्नी डीलियाना यांना शिवोली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तृणमूल काँग्रेसच्यावतीने थिवी मतदारसंघातून कविता कांडोळकर तर हल्डोना मतदारसंघातून किरण कांदोलकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सांगे मतदारसंघातून चंद्रकांत कावळेकर यांची पत्नी सावित्री कवलेकर अपक्ष निवडणूक लढविणार आहे.

ढवळीकर बंधू व आलेमाव बाप-लेक मैदानात -

महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर हे बंधू निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुदिन ढवळीकर हे मडकाई तर त्यांचे बंधू प्रीयोळ मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. यंदा प्रथमच वालांका आलेमाव आणि चर्चिल आलेमाव ही बाप-लेकीची जोडी निवडणूक लढवणार आहे. वालांका न्हावेली तर चर्चिल आलेमाव बाणवली मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

गोव्यात महिलांना राजकारणात नशीब आजमावायची संधी मिळाली आहे. घराणेशाहीत आपल्या पतीसोबत ज्या महिला रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना विजय प्राप्त झाल्यानंतर विधानसभेत जायची संधी मिळणार असल्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक गुरुदास सावळ यांनी ईटिव्हीशी बोलताना सांगितले.

घराणेशाहीचा दाखला देत अनेकांचा पत्ता कट -

केवळ नेत्यांचा मुलगा म्हणून भाजपा कोणाला तिकीट देत नाही त्यासाठी काम दाखवावे लागते, असा सूचक इशारा देत भाजपा पक्षश्रेष्ठींनी विशेषतः उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी नाकारली. तोच नियम केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या मुलाला लावत कुंभरजुवे मतदारसंघातून सिढेश नाईक यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, भाजपाने माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा यांच्या मुलाला म्हापसा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. 2019 साली झालेल्या पोटनिवडणुकीत म्हापसा मतदारसंघातून जोशुआं डिसुझा यांचा विजय झाला होता. त्यांनाच भाजपाने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.