पणजी : सध्या राज्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयारी केली जात आहे. त्याचबरोबर निवडणुकीचे वारे देखील वाहू लागले आहे. गोवा विधानसभेची निवडणूक येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहेत. विधानसभेच्या ४० जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यानुसार भाजपने जाहीर आपली तयारी सुरु केली आहे. तसेच राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आज गोव्यात दाखल होणार आहेत. तसेच संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant ) यांच्यासोबत ते मये मतदारसंघात प्रचारसभा ( Maye constituency campaign ) घेणार आहेत.
मये मतदारसंघात फुटणार प्रचाराचा नारळ -
भाजपच्या प्रचाराचा नारळ आज मये मतदारसंघात फुटणार आहे. राज्याचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition in Maharashtra Devendra Fadnavis )या सभेला संबोधित करणार आहेत. मये हा भाजपचा बालेकिल्ला आहे. यात भाजपचे विद्यमान आमदार प्रवीण झांट्ये ( BJP MLA Praveen Zantye ) या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. फडणवीस यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे या प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. सोबतच राज्य प्रभारी सुलक्षणा सावंत उपस्थित असणार आहेत.
अद्याप उमेदवार यादी जाहीर नाहीच -
गोवा विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. काही पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले आहेत. मात्र, कोविडच्या आणि ओमायक्रॉन सावटाखाली ( Covid and omicron ) निवडणूक आणि आचारसंहिता कधी घोषित होणार की निवडणुका पुढे ढकलल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. म्हणूनच भाजपने सावध पवित्रा घेत अद्याप आपली उमेदवार यादी घोषित केली नाही आहे.
सोमवारी होणार चित्र स्पष्ट -
राज्यात सध्या नवीन वर्षाच्या स्वागताची सुरुवात झाली आहे. त्यात सरकारने कोविड आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना काही निर्बंध घालून दिले आहेत. त्यानुसार नवीन वर्ष साजरे करण्याची विनंती केली आहे. मात्र, अद्याप राज्यातील निर्बंध अजून कडक केले नाहीत. परंतु नववर्षांत सोमवारी पुढील परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant ) यांनी सांगितले.
Goa Assembly Election : देवेंद्र फडणवीस आज गोव्यात, 'या' मतदारसंघात होणार प्रचारसभा - मये मतदारसंघात प्रचारसभा
राज्याच्या विधानसभा निवडणुका ( Goa Assembly Election ) कधी होणार हे निश्चित नाही. मात्र भाजपाने आपली तयारी सुरु केली आहे. त्यानुसार प्रचारसभांचे आयोजन केले जात आहे. तसेच राज्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis in charge of state elections ) गोव्यात दाखल होणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत मये मतदारसंघात प्रचारसभा घेणार आहेत.