ETV Bharat / city

'इफ्फी' महोत्सवाच्या पार्श्वभूमिवर कला अकादमीच्या रंगरंगोटीला वेग, युद्धपातळीवर काम सुरू - COULERING

या पार्श्वभूमीवर कला अकादमीची दरवर्षी रंगरंगोटी केली जाते. पण यासाठी कलाकारांना मोठे परिश्रम घ्यावे लागतात. कारण या इमारतीची रंगसंगती आणि त्यावरील कलाकृती मागील अनेक वर्षे आहे तशाच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कला अकादमीला भेट देणाऱ्याला मोकळ्या जागेतील सार्वजनिक ठिकाणी असलेली ही कलाकृती दरवर्षी नवी भासते.

रंगवलेला पडदा
author img

By

Published : Nov 11, 2019, 7:47 PM IST

पणजी - राजधानीत दर्यासंगमावर थाटात उभी असलेली कला अकादमीची वास्तू कलाकरांबरोबरच पर्यटकांना आकर्षित करत असते. पावसाळा संपता संपता दरवर्षी नवा साज घेत असते. यासाठी कलाकार राबत असतात. परंतु, मूळ रंगसंगतीला कुठेही तडा दिला जात नाही. त्यामुळे अनेक वर्षे होऊनही सदर कलाकृती आहे तशी आहे, असा भास होत असतो.

पडदा रंगवणारे कलाकार किरण नाईक

पणजीतील इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जोडीने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) करिता कला अकादमीचे नाट्यगृह आणि परिसर वापरला जातो. याची प्रेक्षक क्षमता ९०० पेक्षा अधिक असल्याने चित्रपट रसिकांना तिकीट उपलब्ध होण्यास मदत होते. त्याशिवाय येथील 'ब्लँकबॉक्स' मध्ये या काळात विविध मान्यवरांच्या मुलाखती, कार्यशाळा दिवसभर होत असतात. त्यामुळे इफ्फीमध्ये कला अकादमीला महत्त्वाचे स्थान आहे.

या पार्श्वभूमीवर कला अकादमीची दरवर्षी रंगरंगोटी केली जाते. पण यासाठी कलाकारांना मोठे परिश्रम घ्यावे लागतात. कारण या इमारतीची रंगसंगती आणि त्यावरील कलाकृती मागील अनेक वर्षे आहे तशाच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कला अकादमीला भेट देणाऱ्याला मोकळ्या जागेतील सार्वजनिक ठिकाणी असलेली ही कलाकृती दरवर्षी नवी भासते.

या चित्रांचे कशा प्रकारे जतन करत नवी उजाळी दिली जाते याविषयी बोलताना चित्रकार किरण नाईक म्हणाले, की मूळ चित्राला धक्का न लावता ती चित्रे आहे तशीच ठेवावी हा यामागील हेतू आहे. यासाठी आवश्यक ती प्राथमिक प्रक्रिया करूनच रंगकाम केले जाते. यांचे रंगकाम दिवसाच्या उजेडात केले जाते.

आपल्या कलेविषयी बोलाताना नाईक म्हणाले, की वडिलांकडून मी पडदे रंगविण्याची कला आत्मसात केली. वडिलांनीच कला अकादमी तसेच अनेक नाट्यसंस्थांना पडदे रंगवून दिले आहेत. ज्यामध्ये कला अकादमी आणि राज्यातील रविंद्र भवनाचा समावेश आहे. मीही अलीकडे काही पडदे रंगवून दिले आहेत.

दरम्यान, आठवड्यापूर्वी पर्यंत झालेल्या पावसामुळे रंगकामाला उशीर झाला. तर काही ठिकाणी पुन्हा काम करावे लागले. २० नोव्हेंबरला इफ्फी उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी महोत्सवात वापरल्या जाणाऱ्या इमारती, परिसर आणि मार्गाचे रंगकाम पूर्ण करण्यासाठी कारागीर युद्धपातळीवर काम करताना दिसत आहे.

Intro:पणजी : राजधानीत दर्यासंगमावर थाटात उभी असलेली कला अकादमीची वास्तू कलाकरांबरोबरच पर्यटकांना आकर्षित करत असते. पावसाळा संपतासंपता दरवर्षी नवा साज लेत असते. यासाठी कलाकार राबत असतात परंतु, मूळ रंगसंगतीला कुठेही तडा दिला जात नाही. त्यामुळे अनेक वर्षे होऊनही सदर कलाकृती आहे तशी आहे, असा भास होत असतो.

Body:पणजीतील इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जोडीने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) करिता कला अकादमीचे नाट्यगृह आणि परिसर वापरला जातो. याची प्रेक्षक क्षमता 900 पेक्षा अधिक असल्याने चित्रपट रसिकांना तिकीट उपलब्ध होण्यास मदत होत असते. त्याशिवाय येथील ' ब्लँकबॉक्स' मध्ये या काळात विविध मान्यवरांच्या मुलाखती, कार्यशाळा दिवसभर होत असतात. त्यामुळे इफ्फीमध्ये कला अकादमीला महत्त्वाचे स्थान आहे.
या पार्श्वभूमीवर कला अकादमीची दरवर्षी रंगरंगोटी केली जाते. पण यासाठी कलाकारांना मोठे परिश्रम करावे लागतात. कारण या इभारतीची रंगसंगती आणि त्यावरील कलाकृती दरवर्षी रंगकाम करून ही मागील अनेक वर्षे आहे तशाच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कला अकादमीला भेट देणाऱ्याला मोकळ्या जागेतील सार्वजनिक ठिकाणी असलेली ही कलाकृती दरवर्षी नवी भासते.
या चित्रांचे कशा प्रकारे जतन करत नवी उजाळी दिली जाते याविषयी बोलताना चित्रकार किरण नाईक म्हणाले, मूळ चित्राला धक्का न लावता ती चित्रे आहे तशीच ठेवावी हा यामागील हेतू आहे. यासाठी आवश्यक ती प्राथमिक प्रक्रिया करूनच रंगकाम केले जाते. यांचे रंगकाम दिवसाच्या उजेडात केले जाते.
तर आपल्या कलेविषयी बोलाताना नाईक म्हणाले, वडिलांकडून मी पडदे रंगविण्याची कला आत्मसात केली. वडिलांनीच कला अकादमी तसेच अनेक नाट्यसंस्थाना पडदे रंगवून दिले आहेत. ज्यामध्ये कला अकादमी आणि राज्यातील रवींद्र भवनांचा समावेश आहे. मीही अलीकडे काही पडदे रंगवून दिले आहेत.
दरम्यान, आठवड्यापूर्वी पर्यंत झालेल्या पावसामुळे रंगकामाला उशीर झाला. तर काही ठिकाणी पुन्हा काम करावे लागले. दि. 20 नोव्हेंबरला इफ्फी उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी महोत्सवात वापरल्या जाणाऱ्या इमारती, परिसर आणि मार्गाचे रंगकाम पूर्ण करण्यासाठी कारागीर युद्धपातळीवर काम करताना दिसत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.