पणजी - गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी ( Goa Assembly Election 2022 ) सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली ( Candidate List For Goa Assembly Election ) आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांची आज (बुधवारी) आणखी एक यादी जाहीर केली ( Goa Congress Candidate List ) आहे. लोबो आणि केदार नाईकांना तिकीट देण्यात आले आहे. तर आलेक्स रेजिनाल्ड यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.
काँग्रेसने आपली आणखी एक यादी जाहीर केली असून यात पाच उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.
- शिवोली- दलियाना लोबो
- सालीगव - केदार नाईक
- अलदोना- कार्लोस फरेरा
- प्रियओळ - दिनेश जालमी
- कुडतरी- मोरेनो रिबेल्लो
यादीत लोबो इन तर रेजिनाल्ड आऊट -
नुकताच भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या मायकल लोबो यांना काँग्रेसने तिसऱ्या यादीत स्थान दिले होते. तर आत्ताच जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या यादीत लोबो यांच्या पत्नी दलियाना लोबो यांना शिवोली व त्यांचे समर्थक केदार नाईक यांना सालीगाव मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
हेही वाचा - Goa Assembly election 2022 : काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; गुरुवारी भाजप करणार यादी जाहीर
रेजिनाल्ड यांचा पत्ता कट -
काँग्रेस पक्षातून राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या व पुन्हा माघारी काँग्रेसमध्ये परतलेल्या आलेक्स रेजिनाल्ड यांचा कुडतरी मतदारसंघातून पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे रेजिनाल्ड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे रेजिनाल्ड यांचा काँग्रेस पक्षात पुन्हा परतणे त्यांना अवघड झाले आहे.