गोवा: राज्यात सध्या काँग्रेसचा एक गट (Congress MLAs) भाजपात जाण्यास उत्सुक आहे. मात्र निलंबनाच्या कारवाईची भीती आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळे तुर्तास या घडामोडींना ब्रेक लागला होता. सोमवार नंतर राज्यात काँग्रेस आमदारांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.
काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते माइकल लोबो (Michael Lobo) व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) यांच्यासह पाच ते सहा समर्थक आमदार भाजपात जाण्यास उत्सुक आहेत. मात्र दोन तृतीयांश संख्या नसल्यामुळे या आमदारांचा पक्षप्रवेश रखडला होता. सोमवारी होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक व पावसाळी अधिवेशन यामुळे या आमदारांना पक्ष प्रवेश करणे थोडासं कठीण जात होतं. राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडल्यानंतर कोणत्याही क्षणी हे आमदार आपल्या पदाचा राजीनामा देऊन किंवा दोन तृतीयांश आमदारांचा एक गट घेऊन भाजपात जाणार आहेत.
पोट निवडणूक टाळण्यासाठी चाललेत सगळे प्रयत्न: पुन्हा निवडणुकी सामोरे जाण्याचे टाळण्यासाठी काँग्रेसचा एक गट दोन तृतीयांश आमदार घेऊन भाजपात जाण्यास इच्छुक आहे. मात्र त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही. राज्यात सध्या काँग्रेसचे 11 आमदार असून पक्ष प्रवेश करण्यासाठी आठ आमदारांची गरज आहे. तूर्तास तरी हे संख्याबळ सहा वर येऊन थांबले आहे. मात्र सोमवारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली .व त्यानंतर भलेही संख्याबळ पुरेसे नसल्यास हे पाच ते सहा आमदार आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करणार आहेत व भाजप मधुन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा बोलला जात आहे.
दिगंबर कामत व मायकल लोगो यांची आमदारकी अडचणीत: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व माजी विरोधी पक्ष नेते माइकल लोबो यांच्यावर पक्षाने पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप ठेवत त्यांची आमदारकी रद्द करण्याचे पत्र विधानसभा अध्यक्ष रमेश कवडकर यांना दिले आहे. त्यामुळे जवळजवळ त्यांची पक्षातून हक्कारपट्टी निश्चित मानले जाते आहे. त्यामुळे ही कारवाई टाळण्याकरता मायकल लोबो व दिगंबर कामात कोणत्याही क्षणी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक चार आमदार भाजपात जाण्यास इच्छुक आहेत.
ते पाच आमदार उद्या गोव्यात परतणार: एकीकडे काँग्रेसमधील एक गट भाजपा जाण्यात उत्सुक आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे काही निष्ठावंत भाजप प्रवेश टाळण्यासाठी इच्छुक आहेत. म्हणूनच या राजकीय घडामोडी थांबवण्यासाठी काँग्रेसने आपल्या पाच आमदारांना शुक्रवारी संध्याकाळी चेन्नईला हलविले आहे. उद्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी हे पाचही आमदार सोमवारी सकाळी गोव्यात दाखल होणार आहेत. गोव्यात दाखल झाल्यानंतर ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सहभागी होतील.
अद्याप पाच आमदारांचा भाजप प्रवेश अनिश्चित: भाजपातील पक्ष प्रवेश टाळण्यासाठी चेन्नईत असणारे काँग्रेसचे ते पाच आमदार सोमवारी सकाळी गोव्यात दाखल झाल्यानंतर राज्यात काहीही घडामोडी घडू शकतात, असं एका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पाच आमदारांपैकी किती आमदार काँग्रेस पक्षात प्रवेश करणार याबद्दल अजूनही शंकाआहे.