ETV Bharat / city

Rahul Gandhi in Goa Election 2022 : 2017मध्ये भाजपने काँग्रेसचे जनमत चोरुन सरकार बनविले - राहुल गांधींची टीका

author img

By

Published : Feb 11, 2022, 5:11 PM IST

Updated : Feb 11, 2022, 5:29 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी नुकताच गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हलगर्जीपणा केला होता. त्यामुळे गोव्याला 15 वर्ष भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य मिळाले, असे भाष्य केले होते.

Congress Leader Rahul Gandhi Madgaon PC over Goa Election 2022
2017मध्ये भाजपने काँग्रेसचे जनमत चोरुन सरकार बनविले - राहुल गांधींची टीका

पणजी (गोवा) - 2017मध्ये भाजपने काँग्रेसचे जनमत चोरुन सरकार बनविले, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ( Rahul Gandhi Criticize Bjp over goa assembly election 2022 ) ते आज दुपारी मडगाव येथे पत्रकारांशी आयोजित विशेष चर्चासत्रात बोलत होते. ( Rahul Gandhi pc madgaon goa )

माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी

पंतप्रधान निरर्थक बोलतात -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हलगर्जीपणा केला होता. त्यामुळे गोव्याला 15 वर्ष भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य मिळाले, असे भाष्य केले होते. याविषयी राहुल गांधी यांना विचारले असता ते म्हणाले, मोदी नको त्या निरर्थक गोष्टींवर बोलतात. त्यांनी बेरोजगारी, इंधन दरवाढ, महागाई आदी विषयावर बोलावे, असे ते म्हणाले.

2017साली गोव्याने 17 सीट देऊन काँग्रेसला बहुमताच्या जवळ नेऊन ठेवले होते. मात्र, भाजपने आमचेच आमदार चोरून किंवा घटक पक्षाना जवळ करून राज्य केले. म्हणून 2017 ननंतर गोवेकर भाजपला कंटाळून काँग्रेसला पर्याय म्हणून उभे केले होते, असे राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा - Goa AAP : काँग्रेसला मत म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपाला मत - अरविंद केजरीवाल

गोव्यात 2017 साली जनतेने काँग्रेसला पूर्ण बहुमत दिले होते. मात्र, भाजपने लोकांचा कौल नाकारून पैशाच्या जोरावर आमदार खरेदी करून लोकांचा विकास न करता मागच्या 5 वर्षात भ्रष्टाचार करण्यात वेळ वाया घालवला, अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. मायनिंग, टूरिझम आणि बेरोजगारी याच्यावर अभ्यास करून एक धोरण ठरविले जाईल. येणाऱ्या काळात गोव्यात बहुमताचे स्थिर सरकार बनविणार असल्याचे गांधी यांनी सांगितले.

Last Updated : Feb 11, 2022, 5:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.