ETV Bharat / city

पणजीत भाजपचे उमेदवार मतदारांना धमकावतात, काँग्रेसचा आरोप - criticize

जे सरकारी अधिकाऱ्यांचे नातेवाईक काँग्रेसचा प्रचार करत आहेत, त्यांची बदली करण्याची धमकी गोव्याचे मुख्यमंत्री देत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

पणजीत भाजपचे उमेदवार मतदारांना धमकावतात, काँग्रेसचा आरोप
author img

By

Published : May 4, 2019, 4:59 PM IST

पणजी - पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजप उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे पक्षाध्यक्षांच्या नावाने मतदारांना धमकावत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला. तसेच ही राजकारणाची भाषा नव्हे, असे म्हणत काँग्रेसने याचा निषेध केला आहे.

पणजीत भाजपचे उमेदवार मतदारांना धमकावतात, काँग्रेसचा आरोप

काँग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, पणजीमधील निवडणूक प्रचारात काँग्रेस आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते झोकून काम करत आहेत. तर भाजप विभागलेली दिसत आहे. त्यामुळे भाजप उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नावाने मतदारांना धमकावत आहे.

जे सरकारी अधिकाऱ्यांचे नातेवाईक काँग्रेसचा प्रचार करत आहेत, त्यांची बदली करण्याची धमकी गोव्याचे मुख्यमंत्री देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मर्यादेत राहून प्रचार करावा. तसेच सरकारी अधिकारीही भाजप सत्तेत आहे, म्हणून भाजपला मतदान करावे यासाठी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना धमकावत आहेत. हे त्यांनी थांबवावे.

कुंकळ्येकर हे पणजी स्मार्ट सिटी प्रकल्प हाताळणाऱ्या इमॅजीन पणजीचे संचालक असताना भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला. कुंकळ्येकर यांना यासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्यासाठी वेळ दिला होता. परंतु, त्यांनी तसे केले नाही, अथवा ते माध्यमांसमोर आलेले नाहीत.

इमॅजीन पणजीचे कार्यालय दूरूस्त करण्यासाठी पहिल्यांदा अंदाजे ५ कोटींची निविदा काढण्यात आली होती. परंतु, ते बाजूला करत त्यात पाचपटीने वाढ करून निविदा काढण्यात आली, असे का करण्यात आले, याची दक्षता खात्याकडून चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

इमॅजीन पणजीचे कार्यालय असलेली इमारत ही शंभरवर्षे जूनी आहे. यापूर्वी तेथे गोव्याचे सचिवालय होते. त्याची दुरूस्ती करण्यासाठी इमारतीचा मूळ आराखडा कोणाकडे आहे ? निविदा मागविताना वाढविण्यात आलेले १५ लाख कोणाच्या फायद्यासाठी आहे ? हे कुंकळ्येकरांनी जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Intro:पणजी : पणजी पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळणार प्रतिसाद पाहून भाजप उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर पक्षाध्यक्षांच्या नावाने मतदारांना धमकावर आहेत. ही राजकारणाची भाषा नव्हे म्हणत त्याचा काँग्रेसने निषेध केला आहे.

Body:काँग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, पणजीत निवडणूक प्रचारात काँग्रेस आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते झोकुन देत काम करत आहेत. तर दुसरीकडे भाजप विभागलेली दिसत आहे. त्यामुळे भाजप उमेदवार सिध्दार्थ कुंकळ्येकर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाने मतदारांना धमकावत आहे. ही राजकारणाची भाषा नव्हे, त्याचा आम्ही निषेध करतो.
तर दुसरीकडे गोव्याचे मुख्यमंत्री ज्या सरकारी अधिकाऱ्यांचे नातेवाईक काँग्रेसचा प्रचार करत आहेत, त्यांना बदली करण्याची धमकी देत आहेत, असे सांगून चोडणकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आपल्या मर्यादित राहून प्रचार करावा. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी भाजप आज सत्तेत आहे म्हणून भाजपला मदत करण्यासाठी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना धमकावत आहेत. ते त्यांनी थांबवावे हा इशारा आहे.
कुंकळ्येकर हे पमजी स्मार्ट सिटी प्रकल्प हाताळणाऱ्या इमँजीन पणजीचे संचालक असताना त्यांनी सरकारी पैशाची उधळपट्टी करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप करून चोडणकर म्हणाले, कुंकळ्येकर यांना या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्यासाठी वेळ दिला होता. परंतु, त्यांनी तसे केले नाही अथवा माध्यमांसमोर आलेले नाहीत. गोवा साधन सुविधा महामंडळामध्ये जसा भ्रष्टाचार करत होते तिच पध्दती येथे वापरली जात आहे.
इमँजीन पणजीचे कार्यालय दूरूस्ती करण्यासाठी पहिल्यांदा अंदाजित 5 कोटिंची निविदा काढण्यात आली होती. परंतु, ते बाजूला करत पाच पटीने वाढ करून निविदा काढण्यात आली. असे का करण्यात आले याची दक्षता खात्याकडून चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करत चोडणकर म्हणाले, इमँजीन पणजीचे कार्यालय असलेली इमारत ही शंभरवर्षे जूनी आणि यापूर्वी तेथे गोव्याचे सचिवालय होते. त्यामुळे याची दुरूस्ती करण्यासाठी इमारतीचा मूळ आराखडा कोणाकडे आहे. आणि निविदा मागविताना वाढविण्यात आलेले 15 लाख कोणाच्या फायद्यासाठी हे कुंकळ्येकर यांनी जाहीर करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.