ETV Bharat / city

हैदराबाद पाठोपाठ भाजपला गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश

author img

By

Published : Dec 14, 2020, 9:21 PM IST

Updated : Dec 14, 2020, 10:06 PM IST

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने पुर्ण बहुमत प्राप्त केले आहे. यामुळे भाजप आणि माझ्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या कसोटीला खरे उतरल्याची ही पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली.

goa
गोवा

पणजी - हैदराबाद पाठोपाठ भाजपला गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपने पुर्ण बहुमत प्राप्त केले आहे. यामुळे भाजप आणि माझ्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या कसोटीला खरे उतरल्याची ही पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली. जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये भाजपने विरोधीपक्षांचा धुव्वा उडवला आहे.

भाजपच्या कामाची जनतेने दिली पोचपावती -

डॉ. सावंत म्हणाले, हा कोणाचाही वैयक्तिक विजय नाही. ज्या जागा मिळाल्या त्या आणि हरलो त्या जागांकडेही पक्ष म्हणुनच पाहतो. याचे आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत. या निवडणुकीत 80 टक्के मतदार मतदान करणार असल्याने एकप्रकारे सरकारची कसोटी होती. परंतु, आम्ही त्यामध्ये खरे उतरल्याचे गोमंतकीय जनतेने दाखवून दिले आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पक्षाचे पाय मजबूत असल्याची ही खूण आहे. आम्ही विकासाची द्रुष्टी घेऊन काम करतो. आता जिल्हा पंचायत सदस्यांना अधिकार आणि निधी दिला जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण विकासासाठी काम करणारा सदस्य हवा असल्याचे सावंत यांनी सांगितले.

भाजपचा हा ऐतिहासिक विजय

गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष सदानंद तानवडे म्हणाले, कोणत्याही एका पक्षाला पहिल्यांदाच एवढ्या जागा मिळाल्या आहेत. भाजपचा हा ऐतिहासिक विजय आहे. सहा महिन्यांपूर्वी निवडणूक झाली असती तर प्रचाराचे मुद्दे वेगळे असते. भाजप आमदार आणि मंत्र्यांनी लोकांपर्यंत विकास पोहचल्यानेच हे शक्य झाले. तसेच केवळ सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांसाठी चपराक आहे. सरकारला अपशकून करण्यासाठी मधल्या काळात अनेक मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्यांना चपराक आहे. बाराही तालुक्यात भाजप उमेदवार निवडून आले असल्याचे तानवडे यांनी सांगितले.

दरम्यान, विजयी उमेदवारांचा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते महालक्ष्मी निवस्थानी सत्कार करण्यात आला.

Last Updated : Dec 14, 2020, 10:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.