ETV Bharat / city

कॅप्टनने वादळाचा इशारा गंभीरपणे घेतला नव्हता, पी ३०५ बार्जवरील फायरमनचा आरोप

author img

By

Published : May 26, 2021, 4:42 PM IST

तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात पी ३०५ बार्ज बुडाले आणि त्यात अनेकजण मृत्युमुखी पडले. १५ मे रोजी चक्रीवादळाची माहिती बार्जवरील सर्वांना मिळाली होती. कॅप्टन राकेश बल्लव याने वादळाचा इशारा गंभीरपणे घेतला नव्हता. त्यामुळेच, ही दुर्घटना घडली, असा आरोप दुर्घटनेतून बचावलेल्या बार्जवरील फायरमनने केला.

P 305 Barge Captain Information by Anand Dimatti
पी ३०५ बार्ज कॅप्टन माहिती आनंद डिमट्टी

पणजी (गोवा) - तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात पी ३०५ बार्ज बुडाले आणि त्यात अनेकजण मृत्युमुखी पडले. १५ मे रोजी चक्रीवादळाची माहिती बार्जवरील सर्वांना मिळाली होती. कॅप्टन राकेश बल्लव याने वादळाचा इशारा गंभीरपणे घेतला नव्हता. त्यामुळेच, ही दुर्घटना घडली, असा आरोप या दुर्घटनेतून बचावलेला बार्जवरील फायरमन आणि गोवा हळदोणे येथील रहिवाशी आनंद डिमट्टी याने केला. आनंदने तब्ब्ल १५ तास समुद्राच्या तुफानी लाटांसोबत झुंज दिली आणि मृत्यूवर विजय मिळवून तो गोव्यात परतला.

माहिती देताना फायरमन आनंद डिमट्टी

हेही वाचा - Cyclone Yaas LIVE Updates : चक्रीवादळाचे ओडिसामध्ये लँडफॉल; काही तासांमध्ये तीव्रता होणार कमी..

मृत्यू समोर दिसत होता, तरीही आम्ही एकमेकांना धीर देत होतो

आनंद डिमट्टी हा २५ वर्षीय तरुण अजूनही या मानसिक धक्यातून बाहेर आलेला नाही. या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झालेला आहे. त्याच्या डोळ्यादेखत त्याच्या सहकाऱ्यांचा बुडून आणि बार्जवर आपटून मृत्यू झाला आहे. त्याने सांगितलेली घटनेची माहिती अंगावर काटा आणणारी होती. आम्हा सर्वांना मृत्यू समोर दिसत होता, तरीही आम्ही एकमेकांना धीर देत होतो. बार्जवरील रूम क्रमांक १२९ मधून तिघा सहकाऱ्यांसह बार्जवर येऊन मीही कॅप्टन काय सूचना करतात याकडे लक्ष देऊन होतो, असे आनंदने सांगितले.

बार्जच्या मागील भागाला मोठा तडा गेला होता

सोमवार (१७ मे) दिवस उजाडला खरा, पण आमच्यासाठी काळरात्रच होती. पहाटे अंदाजे पाच-साडेपाचच्या सुमारास बार्जचे दोन अँकर तुटले. त्यानंतर काही वेळाने उरलेले सहा ॲंकर तुटले, त्यामुळे बार्ज भरकटली. अजस्र लाटांच्या प्रवाहाबरोबर ती ओएनजीसीच्या अनमॅन ऑइल प्लॅटफॉर्मला आदळताच मोठा आवाज झाला. आम्ही एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला आदळलो. मूळ ठिकाणापासून बार्ज अनेक नॉटिकल मैल भरकटत फिरत होती. बार्जच्या मागील भागाला मोठा तडा गेला होता, त्यामुळे बार्ज बुडणार, हे निश्चित झाले होते. त्यामुळे, कॅप्टनने सकाळी अंदाजे १० च्या सुमारास बार्ज बुडण्याची शक्यता व्यक्त केली, अशी माहिती आनंदने दिली.

कॅप्टनने आदेश दिले, जीव वाचवायचा असेल तर लगेच उड्या मारा

सर्वांनी लाईफ जॅकेट घालून तयार राहावे, असे आदेश कॅप्टननी दिले. त्याप्रमाणे आम्ही जॅकेट घालून पुढील आदेशाची वाट पाहत होतो. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळाच्या तडाख्याने जेव्हा बार्ज बुडू लागली तेव्हा कॅप्टनने सर्वांना आदेश दिले. जीव वाचवायचा असेल, तर लगेच उड्या मारा. बोटीवर एकूण २७३ लोक होते. कॅप्टनच्या आदेशानुसार, लाईफ राफ्ट टाकण्यात आला. मात्र, पाण्यात पडून उघडल्यावर तो बार्जला आपटून फुटला. कॅप्टनने उडी मारण्याचे आदेश येताच समुद्र पातळीपासून सुमारे पन्नास मीटर उंचीवरील बार्जवरून आम्ही सर्वांनी समुद्रात उड्या मारल्या. उड्या मारताना काही जणांचे डोके हेलकावणाऱ्या बार्जला आपटले. त्यामुळे, काहींचा त्यात मृत्यू झाला असावा. आपल्यालाही उजव्या पायाला, हाताला व पाठीला जखम होऊन दुखापत झाल्याचे आनंदने सांगितले.

तीन ते चारवेळा आम्हाला वाचवण्यात अपयश आले

तीन ते चारवेळा आम्हाला वाचवण्यात अपयश आले. अखेर नौदलाच्या बचाव पथकाने सातत्याने शर्थीचे प्रयत्न करून आमचा जीव वाचविला. आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता, ऑफशोअर एनर्जी यांनी बचाव मोहीम अखंडपणे सुरू ठेवली होती. बार्जवरील फायरब्रिगेड टीममध्ये आम्ही एकूण तेरा जण होतो. त्यातील योगेश नावाच्या कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाला. गोव्यातून मी एकटाच होतो. ऑफशोअर एनर्जी जहाजातून स्क्रंबल नेटच्या साहाय्याने मला व माझ्या काही सहकाऱ्यांना वर ओढण्यात आले. १९ तारखेला यलो गेट येथे आम्हाला आणण्यात आले. पोलिसांनी आमचा जबाब लिहून घेतला व नंतर आमची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. २० मे रोजी मला बसने गोव्याला पाठवण्यात आले, असे आनंदने सांगितले.

हेही वाचा - धक्कादायक! लखनऊ पाठोपाठ मुंबईतील सांडपाण्यातही आढळला कोरोना विषाणू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.