ETV Bharat / city

गोव्यात कळंगुट पोलिसांकडून सुमारे 3 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

कळंगुट पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात सुमारे ३ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यासंदर्भात एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या नायजेरियन नागरिकाकडे सध्या वैध कागदपत्रे नाहीत. तसेच त्याच्यावर यापूर्वी 2011 आणि 2012 मध्ये दोन गुन्हे दाखल असल्याने त्याही बाजूने चौकशी सुरू करण्यात आली आहे.

आरोपीसह पोलीस पथक
author img

By

Published : Oct 30, 2019, 12:15 AM IST

Updated : Oct 30, 2019, 3:18 PM IST

पणजी - कळंगुट पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज टाकलेल्या छाप्यात सुमारे ३ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले. यासंदर्भात एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे.

गोव्यात कळंगुट पोलिसांकडून सुमारे 3 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

कळंगुट पोलीस निरीक्षक नोलास्को रापोसो यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील कांदोळीमधील एका घरावर छापा टाकला. ज्यामध्ये इफीयान्यी पास्कोल ओबी (Ifeanyi Pascoel Obi ) या 34 वर्षीय नायजेरियन युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ सुमारे 1.021 किलोग्रॅम कोकेन, सुमारे 2.035 किलोग्रॅम एमडीएमए, सुमारे 760 ग्रॅम अॅम्फेटामाईन, सुमारे 106 ग्रॅम चरस, सुमारे 1.270 किलोग्रॅम गांजा आणि 2 लाख रुपयांची रोकड जप्त केली. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे.

गोवा पोलिसांनी अलिकडे अंमली पदार्थ जप्त केलेल्या कारवाईत ही सर्वात मोठी कारवाई आहे. राज्यातून अंमली पदार्थांचा बिमोड करण्याचा गोवा पोलिसांनी चंग बांधला आहे. त्यामुळे अंमलीपदार्थ आणि विक्रेत्यांवर त्यांची सातत्याने करडी नजर आहे. याविषयी कळंगुट पोलीस स्थानकात अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम 21 (सी), 22 (सी), 20 (बी), (2) आणि कलम 20 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर गोवा उपविभागीय पोलीस अधिकारी एडविन कुलासो आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

प्रसून म्हणाले, सध्या एकाच व्यक्तीला अटक करण्यात आली असून यामध्ये आणखी कोण सहभागी आहेत? याचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या नायजेरियन नागरिकाकडे सध्या वैध कागदपत्रे नाहीत. तसेच त्याच्यावर यापूर्वी 2011 आणि 2012 मध्ये दोन गुन्हे दाखल असल्याने त्याही बाजूने चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच तो ज्या घरात राहत होता त्या घरमालकाचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्याने एवढ्या प्रमाणात अमली पदार्थ कोठून आणला याचीही चौकशी सुरू आहे. त्याबरोबरच जर एखादा विदेशी नागरिक योग्य कागदपत्राशिवाय आढळला तर त्याला डिटेंशन सेंटरमध्ये पाठविण्यात येते, अशी माहितीही त्यांनी दिली.

या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी आमोणकर, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रगती मळीक, पोलीस शिपाई विनय श्रीवास्तव, शशांक साखळकर, म्हाबळेश्वर सावंत, सुरेश नाईक, स्मितल बांदेकर, संज्योत केरकर, गोविंद फटनिक, राजेश पार्सेकर, मनोज नाईक, महेंद्र च्यारी, बाबुसो साळगावकर, योगेश खोलकर, लक्ष्मण मांद्रेकर, दिनेश मोरजकर, शैलेश गडेकर आदींनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा : चोरी झालेले मंगळसूत्र लक्ष्मीपूजनला महिलेस मिळाले परत; नांदगाव पोलिसांची कामगिरी

Intro:पणजी : कळंगुट पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने आज टाकलेल्या छाप्यात सुमारे तीन कोटी किंमतीचे अमलीपदार्थ जप्त केला. तसेच एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे.

Body:कळंगुट पोलिस निरीक्षक नोलास्को रापोसो यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरुन पोलिसांनी उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील कांदोळीमधील एका घरावर छापा टाकला. ज्यामध्ये इफीयान्यी पास्कोल ओबी ( Ifeanyi Pascoel Obi ) या 34 वर्षीय युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ सुमारे 1.021 किलोग्रँम कोकेन, सुमारे 2.035 किलोग्रँम एमडीएमए, सुमारे 760 ग्रँम अँम्फेटामाईन, सुमारे 106 ग्रँम चरस, सुमारे 1.270 किलोग्रँम गांजा आणि 2 लाख रुपयांची रोकड जप्त केली. जप्त केलेल्या अमलीपदार्थांची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे.
गोवा पोलिसांनी अलिकडे जप्त केलेल्या अमलीपदार्थाच्या कारवाईत ही सर्वात मोठी आहे. राज्यातून अमलीपदार्थांचा बिमोड करण्याचा गोवा पोलिसांनी चंग बांधला आहे. त्यामुळे अमलीपदार्थ आणि विक्रेत्यांवर त्यांची सातत्याने करडी नजर आहे.
याविषयी कळंगुट पोलिस स्थानकात अमलीपदार्थ विरोधी कायद्याच्या कलम 21 (सी), 22 (सी), 20 (बी), (2) आणि कलम 20 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर गोवा उपविभागीय पोलीस अधिकारी एडविन कुलासो आणि उत्तर गोवा पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
....
फोटो : ng police areest drugs peddler नावाने इमेल

Conclusion:
Last Updated : Oct 30, 2019, 3:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.