ETV Bharat / city

गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

author img

By

Published : Feb 17, 2022, 12:39 PM IST

गोव्यामध्ये 22 अधिक 22 अशा जागा जिंकून पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Pramod Sawant ) यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री
डॉ. प्रमोद सावंत

पणजी - गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Pramod Sawant ) यांनी व्यक्त केला आहे. 22 अधिक 22 जागा नक्की निवडून येतील, असाही विश्वास डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. संध्याकाळी हॉटेल फिदालगो येथे भाजपच्या सर्व उमेदवारांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता स्थापन होणार असून वाढलेल्या मतदानाचा ( Goa Election ) फायदा भाजपला होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 2012 आणि 2017 मध्येही साखळी मतदारसंघात 90 ते 92 टक्के मतदान झाले होते. त्यावेळीही आपण मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी साखळी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 87 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पराभव होईल, अशा चर्चांना उधाण आले होते.

हेही वाचा - Goa Assembly Election Etv Bharat NewsRoom Live : मतदानानंतर सगळ्याच पक्षात अस्वस्थता! 10 मार्चला चित्र होणार स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.