ETV Bharat / city

Goa Election 2022 : तृणमुलशी युती करून राज्यात मगो कार्यकर्ते अस्वस्थ - सदानंद तानावडे - महाराष्ट्र गोमंतक पक्ष

राज्यात महाराष्ट्र गोमंतक पक्षाने आपले उमेदवार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना लॉकरमध्ये ठेवावे, असा खोचक टोला सदानंद तानावडे यांनी मगोला लगावला आहे. भाजपा आपले उमेदवार पळवत आहे, असा आरोप नुकताच मगोने केला होता.

सदानंद तानावडे
सदानंद तानावडे
author img

By

Published : Dec 11, 2021, 2:32 AM IST

पणजी (गोवा) - राज्यात महाराष्ट्र गोमंतक ( Maharashtra Geomantic ) पक्षाने आपले उमेदवार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना लॉकरमध्ये ठेवावे, असा खोचक टोला सदानंद तानावडे यांनी मगोला लगावला आहे. भाजपा आपले उमेदवार पळवत आहे, असा आरोप नुकताच मगोने केला होता.

तृणमूलच्या युतीने मगो कार्यकर्ते अस्वस्थ -

यंदाच्या निवडणुकीत ( Goa Election 2022 ) महाराष्ट्र गोमंतक पक्षाने तृणमुल काँग्रेस पक्षासोबत युती ( TMC Mago Allince ) केली आहे. मात्र, राज्यात स्वातंत्र्यापासून असणाऱ्या या पक्षाचे या युतीमुळे महत्त्व कमी होत असल्याचे दिसत आहे. परिणामी या पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्यांची समजूत काढण्याचे काम पक्षाचे नेते करत आहेत. त्यातच काही कार्यकर्ते नाराज होऊन भाजपच्या वाटेवर आहेत. म्हणून महाराष्ट्र गोमंतक पक्षाने भाजपवर त्यांचे उमेदवार चोरत असल्याचा आरोप केला आहे.

मगो म्हणजे ढवळीकर ब्रदर्स- तानावडे

राज्यात स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र गोमंतक पक्षाने राज्याच्या विकासात भरीव योगदान दिले आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या या पक्षाने अनेक वर्षे राज्य केले. मात्र, सध्या हा पक्ष म्हणजे ढवळीकर ब्रदर्स यांच्यापुरता मर्यादित हा पक्ष असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केली आहे.

हे ही वाचा - Goa Assembly Election 2022 : शिवसेनेने साथ दिल्यास गोवा विधानसभा निवडणुकीत युती - पी. चिदंबरम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.