ETV Bharat / city

गोवा : कायदा सुव्यवस्थावरून अधिवेशनात रणकंदन; मुख्यमंत्रांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी

author img

By

Published : Oct 19, 2021, 9:12 AM IST

Updated : Oct 19, 2021, 9:51 AM IST

विधानसभेच्या दोन दिवशीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून सरकारला धारेवर धरत मुख्यमंत्रांच्या राजीनाम्याची मागणी केली.

goa assembly session
goa assembly session

पणजी - विधानसभेच्या दोन दिवशीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विरोधकांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून सरकारला धारेवर धरत मुख्यमंत्रांच्या राजीनाम्याची मागणी केली. एकीकडे सरकार तुमच्या दारी योजना राबवली असताना राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था पार कोलमडून गेली आहे. त्यामुळे राज्यात हत्या, दरोडे, बलात्काराच्या घटनांत वाढ झाली आहे, असा आरोप करत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कालपासून गोवा विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत विधानसभा अधिवेशनाचे कामकाज चालू होते.

व्हिडीओ

'राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा' -

राज्यात कोविड काळातही कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. यावरून गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्र गोमंतक पार्टी व काँग्रेस ने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लक्ष्य करत कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करत गोव्याची लाज राखावी, अशी मागणी केली.

'विरोधकांना राज्याचा विकास पाहवेना'

भाजपा सरकार राज्यात विविध योजना राबवित आहे. ते विरोधकांना पाहवत नाही. आपल्याला शांतपणे सभागृहात जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. मात्र, विरोधकांना चर्चा नको म्हणूनच ते गोंधळ घालत कामकाज रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोविड मृत्यूला गोवा वैद्यकीय महाविद्यालय जबाबदार -

राज्यात मे महिन्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. यावरून विरोधक व सत्ताधारी यांत चांगलेच रणकंदन माजले होते. विरोधकांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. अखेर हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले होते. त्यावेळी सरकारने एक समिती गठीत करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. अखेर त्या समितीने आपला अहवाल सादर करत कोविड रुग्णांच्या मृत्यूला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला दोषी ठरविले. दरम्यान, या अहवालावर विरोधकांनी आक्षेप घेत याला सरकारच जबाबदार असल्याचे सांगत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

आरोग्यमंत्री गैरहजर -

दरम्यान, आज कोविड रुग्णांच्या मृत्यूबाबत समितीने अहवाल सादर केला. मात्र, याला विरोधक टीका करणार या भीतीनेच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी प्रकृती बिघडल्याने कारण सांगत सभागृहात गैरहजर राहणेच पसंत केले. तरीही त्यांच्या अनुपस्थित विरोधकांनी मुख्यमंत्री व राणे यांना आपल्या भाषणातून लक्ष्य केले.

अधिवेशनातील महत्त्वाचे मुद्दे -

गोवा फॉरवर्डने वाढत्या इंधन दरवाडीचा निषेध करत पणजी बस स्टँड ते विधानसभा, असा पायी प्रवास केला. वाढत्या गुन्हेगारी विरोधात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई, अपक्ष आमदार रोहन खवटे, सुदिन ढवळीकर यांनी सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांच्या सरकार तुमच्या दारी कार्यक्रमावर विरोधकांची टीका राज्यातील योजना अपूर्णवस्थेत असल्याने आमदार रोहन खवटे यांनी सरकारला धारेवर धरले राज्यात 'कोमुनिदाद' (गोव्यातील स्थानिक ग्रामस्थ) च्या सरकारी जमिनी खासगी विकासकांना विकल्या गेल्याचा आरोप काँग्रेस आमदार रेजिनाल्ड यांनी केला. सरकारने राज्यात 1560 कोटींचा कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला.

हेही वाचा - 'करेक्ट कार्यक्रम' करणाऱ्या नेत्याला 'शॉक' द्या, चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना टोला

Last Updated : Oct 19, 2021, 9:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.