पणजी - अमित शाह दुपारी 12 वाजता वायुसेनेच्या विशेष विमानाने गोव्यात दाखल झाले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रणनीती ठरविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारपासून दोन दिवसीय राज्याच्या दौऱ्यावर आहेत.
दौऱ्याची तयारी पूर्ण, रस्ते चकाचक -
अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. त्यांच्या नियोजित कार्यक्रमस्थळ एसआयटीने ताब्यात घेतली असून त्याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजित मार्गावरील रस्त्यांची नव्याने दुरुस्ती करून ते चकाचक करण्यात आले आहे. शहांच्या दौऱ्याच्या तयारीवर आपची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे राज्यातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. मात्र, मागच्या अनेक वर्षांपासून खड्डेमय असलेले रस्ते वेळोवेळी मागणी करूनही सुधारण्यात आले न होते, मात्र त्यांच्या दौऱ्यामुळे हे रस्ते नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय नेत्यांच्या आगमनामुळे का होईना भाजपाला हे रस्ते दुरुस्त करण्याचे शहाणपण सुचले अशी उपरोधिक टीका आम आदमी पक्षाने केली आहे.
कार्यकर्त्याना करणार मार्गदर्शन
आज संध्याकाळी पणजीतील तालीगाव येथील कॅमुनिटी हॉलमध्ये मार्गदर्शन करणार असून याचवेळी राज्यातील विविध आमदार, मंत्री व कोअर कमिटीची बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरविणार आहेत.