पणजी - पर्यावरणावरील वाढत्या आघातामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी जगभरातील पर्यावरणप्रेमी ठिकठिकाणी निदर्शने करत आहेत. गोव्यातही शुक्रवारी संध्याकाळी 'गोवा ग्रीन ब्रिगेड' आणि 'इको चँम्पिमन ऑफ गोवा'च्यावतीने जागृतीसाठी निदर्शने करण्यात आली. ज्यामध्ये स्थानिकांबरोबर विदेशी पर्यटक सहभागी झाले होते.
हेही वाचा - सरकार अन् उद्योगपतींमध्ये अविश्वास वाढत आहे - उद्योगपती अजय पिरामल
या निदर्शनात विदेशी युवती आणि लहान मुले यांचा सहभाग होता. रस्त्याच्या बाजूला उभे राहून फलकांद्वारे संदेश दिला जात होता. तसेच लहान मुले गाणीही म्हणून लोकांना पर्यावरण सरक्षणाचा संदेश देत होती. आंदोलनाविषयी बोलताना गोवा ग्रीन ब्रिगेडचे संयोजक आवेर्तिनो मिरांडा म्हणाले, यापुढे दर शुक्रवारी संध्याकाळी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात पर्यावरण जागृती केली जाणार आहे. यापूर्वी या समस्येविषयी राज्यसरकारला वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत.
हेही वाचा - जोधपूरमध्ये बस अन् बोलेरोचा भीषण अपघात; १६ ठार, १० गंभीर