येवला (नाशिक) - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १४ एप्रिलपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही येवल्यामध्ये शासनाच्या नियमांचे उल्लघंन होत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जात आहे. जोपर्यंत संचारबंदी लागू आहे, तोपर्यंत अशा प्रकारची दररोज कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दंडात्मक कारवाईपंधरा दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला असला तरी येवला शहरात अजूनही नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहे. या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून स्वतः प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येवला शहरातील विंचूर चौफुलीवर विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
दररोज करण्यात येणार कारवाईयेणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत असून ठोस कारण असल्याशिवाय नागरिकांना सोडण्यात येत नाही. विनाकारण फिरणारे तसेच शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने ही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जोपर्यंत ही संचारबंदी लागू आहे. तोपर्यंत अशा प्रकारची दररोज कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा : शिवभोजन थाळीने राज्यात शुक्रवारी दुपारपर्यंत 1 लाख 95 हजार लोकांची भागवली भूक