नाशिक - रोजे का मतलब सब्र..और सब्र ही हथियार है..असं म्हणत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मुस्लिम बांधवाना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेह भाव, सद्भाव, वाढवणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वाला सुरवात झाली आहे. या महिन्यात त्याग, संयम, शांती, चांगुलपणा प्रामाणिकपणा, तसेच माणसाला वाईटापासून दूर ठेवणाऱ्या रमजान महिन्याला विशेष महत्व आहे आणि या उत्सवानिमित्त नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी रमजान सणाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
त्यासंबंधी त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केलाय. संपूर्ण देशात कोरोनाचे सावट असून सर्वांनी खबरदारी घेत घरात नमाज पठण, इफ्तार करण्याचे आव्हान पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी या व्हिडिओ मार्फत केलाय.