नाशिक - मनमाड शहर परिसरासह भालूर, लोहशिंगवे, हिसवळ या ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची काहीकाळ तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा... कोरोनाचा परिणाम; पीक आले कापणीला, पण मजूरच मिळेना!
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ढगाळ वातावरण व विजेचा कडकडाट सुरू होता. मात्र, आज सकाळीच विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. ग्रामीण भागात शेतीमालाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अगोदरच मोठ्या अडचणीत असलेला बळीराजा अवकाळी पावसाने झोडपल्याने पुरता हवालदिल झाला आहे.
हेही वाचा... जळगावात पुन्हा अवकाळी पाऊस... पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान