ETV Bharat / city

लढाऊ हेलिकॉप्टर प्रशिक्षणासाठी 2 महिला अधिकाऱ्यांची पहिल्यांदाच निवड - nashik update news

भारतीय लष्कर दलात कार्यरत असलेल्या दोन महिला अधिकारी पहिल्यांदा हेलिकॉप्टर उडविणार आहे. यासाठी त्यांची नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे.

हेलिकॉप्टर
हेलिकॉप्टर
author img

By

Published : Jun 10, 2021, 5:26 PM IST

नाशिक - भारतीय लष्कर दलात कार्यरत असलेल्या दोन महिला अधिकारी पहिल्यांदा हेलिकॉप्टर उडविणार आहे. यासाठी त्यांची नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली असून जुलै 2022 मध्ये त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. महिलांना आधी केवळ ग्राउंडवरील काम दिले जात असल्याचे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

जुलै 2022मध्ये ट्रेनिंग होईल पूर्ण
आर्मी एविएशनच्या एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी 15 महिला अधिकाऱ्यांनी इच्छा दर्शविली होती. मात्र कठीण परीक्षेनंतर केवळ दोन महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या परीक्षा प्रक्रियेत 'पायलट अ‍ॅप्टीटयूड बॅटरी टेस्ट' आणि मेडिकल टेस्ट यांचा सहभाग होता. या ट्रेनिंग बॅचमध्ये एकूण 47 अधिकारी सहभागी झाले असून जुलै 2021 मध्ये सुरू होणारी ट्रेनिंग जुलै 2022मध्ये पूर्ण होणार आहे. यात ध्रुव, चेतक, चीता हे हेलिकॉप्टर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे हेलिकॉप्टर युद्धाच्या परिस्थितीत मनुष्यबळ पुरवण्यासोबत साधनसामग्री पोहोचवण्याचे काम करते. आर्मीमध्ये एविएशन विंगमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना आतापर्यंत एयर ट्रॅफिक कंट्रोल ही ग्राउंड ड्यूटी दिली जात होती. आर्मी चीफ जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी महिला अधिकारी यांना आर्मी एविएशन विभाग सामील होण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली.

हेही वाचा - Magnet Man नाशिकच्या या व्यक्तीच्या शरीराला चिकटतात लोखंडी वस्तू, लस घेतल्याचा असाही फायदा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.