नाशिक - नैनिताल येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक रस्ते बंद झाले आहेत.अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळे वाहन रस्त्यात अडकून पडली आहे. आणि याचा फटका नैनिताल मध्ये अडकलेल्या नाशिकच्या यात्रेकरूंना देखील बसला आहे. नैनितालमध्ये अडकलेल्या नाशिकच्या यात्रेकरूंसाठी नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मदतीला धावून आले आहेत.
यात्रेकरुंची केली सुटका
नैनिताल येथे पावसात अडकलेल्या यात्रेकरूंनी नाशिक येथे घरच्यांशी संपर्क साधला यावेळी नातेवाईकांनी नैनिताल मध्ये अडकलेल्या यात्रेकरूंची माहिती जिल्हाधिकार्यांना दिली आणि मदतीचे आवाहन केले. यावेळी तात्काळ जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नैनिताल येथील स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला मदतीचे आवाहन करत पुरात अडकलेल्यांना नैनिताल स्थानिक प्रशासनाने तत्परता दाखवली. आणि अडकलेल्या सत्तावीस यात्रेकरूंचे सुखरूप सुटका केली. नैनिताल मधील एका हॉटेलमध्ये सुरक्षितरित्या राहण्याची व्यवस्था केली आहे. बुधवारी सकाळी बसद्वारे सुरक्षितरीत्या त्यांना हरिद्वार येथे पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या 27 यात्रेकरूंमध्ये येवला तालुक्यातील चार शेतकरी तर मालेगाव तालुक्यातील 24 यात्रेकरूंचा समावेश आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तात्काळ मदत केल्याने मुसळधार पावसात अडकलेल्या यात्रेकरूंना एक प्रकारे जीवदान मिळाले सर्व यात्रेकरू आता सुरक्षित असून नैनिताल येथील परिस्थिती निवळल्यानंतर ते परतीच्या वाटेवर निघणार आहेत.
हेही वाचा - जावेद अख्तर आले आर्यन खानच्या समर्थनार्थ, म्हणाले बड्या सेलिब्रिटींना लक्ष्य केलं जातंय