ETV Bharat / city

Schools Start : ढोल-ताशा वाजत शाळा झाली सुरू, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावण

गेली दोन वर्षांपासून सर्वत्र शाळा, कॉलेज बंद आहेत. या सर्व काळात विद्यार्थी शाळा कधी सुरू होतील याची वाट पाहत होते. आता सर्वत्र शाळा, कॉलेज, विद्यापीठ हळुहळु पुर्ववत होत आहेत. नाशिकमध्येही बंद असलेल्या शाळा तब्बल दोन वर्षानंतर सुरू झाल्या आहेत. खूप दिवसांनी शाळा सुरू होत असल्याच्या आनंदाला चांगलाच बहर आला आहे. येथे ढोल-ताशा वाजत आणि मिठाई वाट विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले. येथे आज पाहिली ते सातवीचे वर्ग सुरू झाले आहेत.

ढोल-ताशा वाजत शाळा झाली सुरू, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावण

author img

By

Published : Dec 13, 2021, 1:26 PM IST

नाशिक - गेली दोन वर्षांपासून सर्वत्र शाळा, कॉलेज बंद आहेत. या सर्व काळात विद्यार्थी शाळा कधी सुरू होतील याची वाट पाहत होते. आता सर्वत्र शाळा, कॉलेज, विद्यापीठ हळुहळु पुर्ववत होत आहेत. ( The school started Nashik ) या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही बंद असलेल्या शाळा तब्बल दोन वर्षानंतर सुरू झाल्या आहेत. खूप दिवसांनी शाळा सुरू होत असल्याच्या आनंदाला चांगलाच बहर आला आहे. ( schools have started in the state ) येथे ढोल-ताशा वाजत आणि मिठाई वाट विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले. येथे आज पाहिली ते सातवीचे वर्ग सुरू झाले आहेत. दरम्यान, कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जात आहे.

व्हिडिओ

ऑफलाइन पध्दतीने शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सरकारने पहिल्या टप्प्यात शहरातील इयत्ता आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू केले त्यानंतर आजपासून नाशिक शहरातील इयत्ता पहिली ते सातवी तर ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरू झालेत. आज तब्बल दोन वर्षानंतर ऑफलाइन पध्दतीने शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शाळांनी देखील कोरोना नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांचं ढोल ताशांच्या गजरात पुष्प देऊन स्वागत केले. आज पहिल्या दिवशी 60 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली.

नाशिक शहरातील पहिली ते सातवीच्या वर्गाची स्थिती

नाशिक शहरात 101 महानगरपालिकेच्या शाळा असून 403 खाजगी शाळा अशा एकूण 504 शाळा आहेत. यात पाहिले ते सातवीचे 3700 वर्ग असून यात विद्यार्थ्यांची संख्या 1लाख 85 हजार 279 इतकी आहे. तर शिक्षकांची संख्या 4714 इतकी आहे.

काय आहेत नियम ?

  • पालकांची संमती घेऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती
  • जास्तीत जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना दोन सत्रात शाळा भरणार.
  • मुख्य विषयांचा अध्ययन व अध्यापन करण्याचा प्रयत्न.
  • एका बाकावर एकच विद्यार्थी बसणार.
  • प्रत्येक विद्यार्थ्याकडे दोन मास्क ठेवण्याच्या सूचना.
  • प्रत्येक वर्गाबाहेर सॅनिटायझरची व्यवस्था.
  • फिजिकल डिस्टंसिंगचे पालन प्रत्येकासाठी अनिवार्य
  • शालेय वाहतुकीचा वापर शक्यतो टाळावा,किंवा शालेय वाहतूकदारांनी सोशल डिस्टंसिंग पालन करावे.
  • लसीकरणाची दोन डोस पूर्ण झालेल्या शिक्षकांना अध्यापनाचे कार्य द्यावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.