ETV Bharat / city

बिटको हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी भाजपा नगरसेविकेचा पती राजेंद्र ताजणे पोलिसांना शरण, दोन दिवसांची पोलीस कोठडी - बिटको रुग्णालयात कार घुसवण्याचा प्रकार

अटक होऊ नये म्हणून ताजणे याने अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला हाेता. दरम्यान पोलिसांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला परंतु ताे, सापडला नाही. नाशिक रोड पोलिसांनी ताजणेच्या अनेक मित्रांना नोटीस देऊन चौकशी केली होती. मात्र तरीही ताे सापडला नाही. अखेर ताजणे सोमवारी सायंकाळी स्वतःहून नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

राजेंद्र ताजणे पोलिसांना शरण, दोन दिवसांची पोलीस कोठडी

author img

By

Published : Aug 4, 2021, 7:20 AM IST

नाशिक- नाशिक राेडच्या नवीन बिटको रुग्णालयात तोडफोडप्रकरणी गेल्या अडीच महिन्यांपासून फरार असलेल्या राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे नाशिक रोड पोलिसांना शरण आला आहे. त्यानंतर मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ताजणे हा सोमवारी संध्याकाळच्या सुमारास स्वतःहून नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल होत पोलिसांना शरण आला होता. ताजणे हा नाशिक महापालिकेतील भाजपाच्या नगरसेविका सीमा ताजणेंचा पती आहे.

थेट बिटको हॉस्पिटलमध्ये आपली गाडी घुसवत केली होती तोडफोड...

नाशिकरोड बिटको हॉस्पिटलमध्ये कोराेना उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य सुविधा मिळत नाही,म्हणून दिनांक 15 मे रोजी कन्नू ताजणे याने नवीन बिटको हॉस्पिटलच्या काचेच्या प्रवेशद्वारातून ईनोव्हा कार थेट आतमध्ये घुसवून नुकसान केले होते. त्यानंतर ताजणे फरार होता. अटक होऊ नये म्हणून ताजणे याने अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला हाेता. दरम्यान पोलिसांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला परंतु ताे, सापडला नाही. नाशिक रोड पोलिसांनी ताजणेच्या अनेक मित्रांना नोटीस देऊन चौकशी केली होती. मात्र तरीही ताे सापडला नाही. अखेर ताजणे सोमवारी सायंकाळी स्वतःहून नाशिक रोड पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

रुग्णांना रेमडेसिवीर मिळत नसल्याचा आरोप, मेन गेटची तोडफोड

भाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांच्या पतीने नाशिक रोड येथील महानगरपालिका संचलित बिटको रुग्णालयाच्या मुख्य दरवाजातून थेट इनोव्हा कार रुग्णालयात घुसवली होती. यामुळे रुग्णालयाचे गेट उद्ध्वस्त करत साहित्याची तोडफोड करण्यात आली. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा न झाल्याने ते संतापले होते. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारे रुग्णालयाची तोडफोड केली, अशी चर्चा त्यावेळी होती.

या घटनेमुळे रुग्णालयात काही काळ खळबळ उडाली होती. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिक रोड पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस पथक याठिकाणी दाखल झाले. पोलीस गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत.

झालेला प्रकार हा निंदनीय -

झालेला प्रकार हा निंदनीय आहे. परंतु हे पाऊल का उचलावे लागले, या संदर्भामध्ये स्वतः प्रशासनानेही काही गोष्टींचा विचार करावा म्हणजे त्यांना त्याबाबत खुलासा होऊ शकतो. आज कोरोना रुग्णांना उपचारासाठी योग्य ती उपचार पद्धती मिळत नाही. गोळ्या औषध बाहेरून आणण्यास सांगितले जाते. तसेच इंजेक्शन दिले गेल्याचे सांगितले जाते; परंतु दिले जात नसल्याचा संशय व्यक्त करत त्या म्हणाल्या की याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी घेऊन माझ्याकडे(सीमा ताजणे) ही आले आहेत. याबाबत प्रशासनाला वारंवार सूचनाही केल्या माहिती पाठवली; परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नाही. याच संतापातून हा प्रकार घडला आहे, अशी प्रतिक्रिया त्यावेळी नगरसेविका सीमा ताजणे यांनी दिली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.