नाशिक - नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजेंच्या खून प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली ( Suvarna Vaze Murder Case ) आहे. सुवर्णा वाजेंचा मृतदेह सॅनिटायझर टाकून जाळल्याची कबुली पती संदीप वाजे याचा मावसभाऊ बाळासाहेब उर्फ यशवंत म्हस्के याने दिली आहे. मात्र, खून कसा केला याबाबत त्याने चुप्पी साधल्याने पोलिसांना याप्रकरणी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
वाडीवऱ्हे परिसरात एका कारमध्ये सुवर्णा वाजे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. कौटुंबिक वादातून सुवर्णा वाजे यांच्या पतीने हत्या केल्याचे समोर आले होते. संदीप वाजे याला अटक केल्यानंतर, तपासात मावस भाऊ बाळासाहेब मस्के याचं नाव समोर आले. पोलिसांनी बाळासाहेब मस्केची कसून चौकशी केली असता, सुवर्णा वाजेंचा मृतदेह सॅनिटायझने जाळल्याचे समोर आले आहे. मस्के याने पोलिसांना घटनास्थळावर सॅनिटायझरची पाच लिटरची कॅन ठेवल्याचे दाखवले आहे. तर, दुसरी कॅन संदीपच्या गाळ्यात ठेवल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली आहे.
छळ कर म्हणजे ती...
मस्के याने स्वत:च्या पत्नीला सोडण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला होता. तसेच, डॉ सुवर्णा यांचा छळ कर म्हणजे ती आत्महत्या करेल, असा सल्ला मस्के यांनी संदीप वाजेला दिला होता. मात्र, डॉ सुवर्णा यांनी पतीच्या अशा त्रासाला भीक न घातल्याने खून केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.