ETV Bharat / city

Suhas Kandes Posters In Manmad: 'का गेलो हे सांगण्यासाठी मी आलो, पण संधी दिली नाही' - सुहास कांदे

आदित्य ठाकरे आज मनमाड दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे ( MLA Suhas Kande ) यांनी मनमाडमध्ये पोस्टरबाजी केली आहे. "माझं काय चुकलं" या आशयाचे पोस्टर सुहास कांदे यांनी शहरभर चौकाचौकात लावले आहेत. त्यांनी 4 ते 5 हजार कार्यकर्त्यांना घेऊन निवेदन देण्याची घोषणा देखील केली आहे.

Suhas Kande
सुहास कांदे
author img

By

Published : Jul 22, 2022, 11:25 AM IST

Updated : Jul 22, 2022, 5:44 PM IST

मनमाड - आमदार सुहास कांदे ( MLA Suhas Kande ) यांनी "माझं काय चुकलं" म्हणत मनमाड शहरात बॅनर लावले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या काही तास आधी पोस्टर लावत त्यांनी 4 ते 5 हजार कार्यकर्त्यांना घेऊन निवेदन देण्याची घोषणा देखील केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

सुहस कांदे बोलताना

सत्तांतरानंतर शिवसेना ऍक्टिव्ह मोडमध्ये - राज्यातील सत्तानाट्यानंतर शिवसेना ऍक्टिव्ह मोडमध्ये आली असल्याचे पहायला मिळत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ( Yuva Sena chief Aditya Thackeray ) यांनी शिवसंवाद यात्रेला सुरवात केली आहे. आज नांदगांव तालुक्यातील मनमाड येथे त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या अवघ्या काही तास आगोदर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी "माझं काय चुकल" ( whats wrong with me ) असे आशयाचे पोस्टर ( Poster ) शहरातील प्रत्येक चौकात लावले आहे. या पोस्टरवर विविध संदेश लिहण्यात आले आहेत. या पोस्टरची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात कांदे हे 4 ते 5 हजार शिवसैनिकांना सोबत घेऊन आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

सुहास कांदे

ठाण्यात आदित्य ठाकरेंची गर्जना - शिवसेना सोडून गेलेल्यांच्या रक्तात शिवसेना नव्हतीच, गेलेले ते गद्दारच आहेत. बंड करण्यासाठी हिंम्मत लागते. शिवसेनेविरुद्ध बंड केले असते, तर गुवाहाटी, सुरतला पळून गेले नसते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह ( CM Eknath Shinde ) शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांवर माजी मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी केली . शिवसंवाद दौऱ्यानिमित्याने भिवंडीतील शिवसैनिकांच्या आदित्य ठाकरेंनी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा शिवसेना सोडून गेलेल्या लोकप्रतिनिधींना गद्दार म्हणून संबोधित केले ( Aaditya Thackeray Criticized Shinde Group Rebel Mlas ) आहे.ज्यांना परिवारासारखे समजले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. गेले अडीच वर्ष महाविकास आघाडीत होते. त्यावेळी खाऊन त्यांना अपचन झाले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे नाव न घेता, आदित्य ठाकरे यांनी केली . पण, आम्ही महाविकास आघाडी सोबत असताना विकासाची कामे केली. राजकारण कमी केलं, ८० टक्के समाजकरण २० टक्के राजकारण केले असेही आदित्य ठाकरे म्हणाले

हेही वाचा - CBSE 12th Exam Result : सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर

Last Updated : Jul 22, 2022, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.