ETV Bharat / city

राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यार्थी परिषदेचे नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन

कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीनंतर आता सर्व काही सुरळीत होत आहे. राज्य शासनाने मद्याची दुकाने, हॉटेल, नाट्यगृह, पर्यटनस्थळे, सिनेमागृहे, नाईट क्लब सर्व काही सुरू करण्यास परवानगी दिली, मग महाविद्यालये बंद का? असा प्रश्न उपस्थित करत लवकर महाविद्यालये सुरू करा, अन्यथा तीव्र अदोलन करू असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.

student movement
student movement
author img

By

Published : Feb 2, 2021, 3:00 PM IST

Updated : Feb 2, 2021, 3:08 PM IST

नाशिक - राज्यातील महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आग्रह धरला आहे. आज नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयासमोर विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थी परिषदेचे नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन
मद्यालये-सिनेमागृह सुरू, मग महाविद्यालये बंद का ?कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीनंतर आता सर्व काही सुरळीत होत आहे. राज्य शासनाने मद्याची दुकाने, हॉटेल, नाट्यगृह, पर्यटनस्थळे, सिनेमागृहे, नाईट क्लब सर्व काही सुरू करण्यास परवानगी दिली, मग महाविद्यालये बंद का? असा प्रश्न उपस्थित करत लवकर महाविद्यालये सुरू करा, अन्यथा तीव्र अदोलन करू असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे. शासनाने गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्यासाठी लवकरात लवकर परवानगी द्यावी, अशी मागणी करत मंगळवारी राज्यभरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. यात नाशिकच्या एचपीटी कॉलेजच्या प्रवेशद्वाराबाहेर सकाळच्या सुमारास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करून महाविद्यालय सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.आंदोलनाची राज्यशासन दखल घेऊन कॉलेज सुरू करणार का?अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनाची राज्य शासनाने दखल घेत सर्व राज्यातील महाविद्यालये खुली करण्यासाठी परवानगी द्यावी, अन्यथा येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता या आंदोलनाची राज्यशासन दखल घेऊन कॉलेज सुरु करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Feb 2, 2021, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.