ETV Bharat / city

गंगाद्वारच्या गोमुख मंदिराजवळ कोसळले दगड, टळली मोठी दुर्घटना - nashik rain news in marathi

हा भाग वन खात्याच्या अखत्यारीत येत असून धोकादायक दगडांना संरक्षक जाळी लावावी, अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा केले आहे, मात्र त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही, त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना धोका कायम आहे.

गोमुख मंदिर
गोमुख मंदिर
author img

By

Published : Jul 17, 2021, 4:35 PM IST

Updated : Jul 17, 2021, 5:12 PM IST

नाशिक - त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतरांगेतील गंगाद्वार येथे डोंगराच्या कड्यावरील दगड व माती गंगा गोदावरी मंदिरासमोरील पटांगणात कोसळली. कोरोनामुळे भाविक नसल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी या ठिकाणी संरक्षक जाळी बसवण्याची मागणी होत आहे.

अद्याप कुठलाही निर्णय नाही

या भागात दरडी कोसळण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. उन्हाळ्यात ब्रह्मागिरी पर्वतावरील दगड मोठ्या प्रमाणात तापतात. यानंतर पाऊस सुरू झाल्यानंतर या पाण्यामुळे या दगडांना तडे पडतात, त्यामुळे दगड व माती मोकळी होऊन अनेक वेळा येथे दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. हा भाग वन खात्याच्या अखत्यारीत येत असून धोकादायक दगडांना संरक्षक जाळी लावावी, अशी मागणी नागरिकांनी अनेक वेळा केले आहे, मात्र त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही, त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना धोका कायम आहे. या कोसळलेल्या दगडांमुळे गोमुख गोदावरी मंदिराचे व इतर मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही. त्रंबकेश्वर क्षेत्रात ब्रह्मगिरी व गंगाद्वार हे गोदावरीची उत्पत्ती म्हणून प्रसिद्ध आहे.

विद्यार्थिनीचा मृत्यू

या परिसरात काही वर्षांपूर्वी दरड कोसळल्याने एका भाविक जखमी झाला होता, नंतर एक विद्यार्थिनीच्या डोक्यात दगड पडल्याने ती गंभीर जखमी झाली होती. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता, त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांचा विचार करता उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांनी म्हटले आहे.

'जाळी बसवण्यासाठी प्रयत्न सुरू'

सप्तशृंगी गडावर प्रतिबंधक संरक्षक लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे, त्याप्रमाणे गंगाद्वार येथे योजना कार्यान्वित करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. सुरक्षेसाठी संरक्षक जाळी गरजेची आहे. या घटनेत दगड कोसळून तुकडे झाले आहेत. दरड कोसळलेली नाही. लवकरात लवकर येथे जाळी बसवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वन अधिकारी विवेक भदाणे यांनी सांगितले आहे.

Last Updated : Jul 17, 2021, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.